Marathi Biodata Maker

सोलापूर-पुणे इंटरसिटी चार महिन्यांसाठी रद्द

Webdunia
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (11:05 IST)

सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस १ नोव्हेंबरपासून चार महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे.  सोलापूर-दौंड रेल्वेमार्गावर वाशिंबे ते जेऊर दरम्यान रेल्वेमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी येत्या १ नोव्हेंबरपासून १२५ दिवसांसाठी दररोज पावणे दोन तास रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी व शिर्डी-पंढरपूर-शिर्डी या दोन प्रवासी गाड्या संपूर्ण कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. तर अन्य काही गाड्या ठराविक मार्गावर धावणार आहेत.

याशिवाय पुणे-सोलापूर गाडीदेखील भिगवणपर्यंतच धावणार आहे. हैद्राबाद-पुणे एक्स्प्रेस पुण्याला न जाता कुर्डूवाडीपर्यंत धावणार आहे. तर पुणे-हैद्राबाद एक्स्प्रेसही पुण्याहून न सुटता कुर्डूवाडीपासून सुटणार आहे. अमरावती-पुणे ही आठवड्यातून दोनवेळा धावणारी गाडी संपूर्ण १२५ दिवसांच्या कालावधीत एक तास उशिरा धावणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

World Hunger Day 2026 जागतिक भूक दिन का साजरा करतो? इतिहास आणि महत्तव जाणून घ्या

प्रसिद्ध रिलस्टारने स्वतःच्या हॉटेल च्या स्वयंपाकघरात गळफास घेऊन जीवन संपवले

दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना बंदी केल्याने शिंदे आणि ठाकरे गट एकत्र मैदानावर; आंदोलन तीव्र

LIVE: मनोज जरांगे पाटलांची नवी घोषणा: "३० मे पासून रखरखत्या उन्हात बेमुदत उपोषण!"

मनोज जरांगे पाटलांचा ३० मे पासून रखरखत्या उन्हात बेमुदत उपोषणाचा इशारा!

पुढील लेख
Show comments