Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Webdunia
शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (08:20 IST)
दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात आज अर्थात शुक्रवारपासून मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत आज ढगाळलेलं वातावरण आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गुरुवारपासून मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसाचा प्रभाव या आठवड्याच्या अखेरीपर्यंत कायम राहील. विदर्भातही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  
 
चंद्रपूरमध्ये या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपुरात तब्बल 45.4 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात सूर्य आग अक्षरशः ओकत आहे. उष्णतेच्या झळांनी विदर्भवासीय पुरते हैराण झाले आहेत.
 
गुरुवार ते शनिवार दरम्यान रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे ही पावसाची शक्यता आहे. पुणे, अहमदनगर नाशिक येथे हलक्या पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित अफवा फेटाळल्या

1 कोटींची चोरी करणाऱ्या चोराला कुत्र्याने पकडले, पोलिसांचा मोठा खुलासा

मुंबईत हिट अँड रनमध्ये शिक्षिकाचा मृत्यू, 2 वर्षांची मुलगी बचावली

श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित अफवा फेटाळल्या

शिवसेना शिंदे गटाचे नेते शिक्रापूरचे माजी उपसरपंच यांचा धारदार हत्याराने निघृण खून

पुढील लेख
Show comments