Marathi Biodata Maker

दिव्यांगांच्या लसीकरणासाठी दर शनिवारी विशेष शिबिर

Webdunia
शुक्रवार, 4 जून 2021 (08:19 IST)
अमरावतीमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरणात ज्येष्ठ व्यक्ती व दिव्यांगांच्या लसीकरणास प्राधान्य देण्यात येत आहे. त्याचबरोबर, दर शनिवारी दिव्यांगांच्या लसीकरणासाठी विशेष शिबिरांचेही आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.
 
जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी जिल्ह्यातील लसीकरणाचा आढावा ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला, त्याचबरोबर अनाथ बालक संगोपन जिल्हा कृती दलाची (टास्क फोर्स) ऑनलाईन बैठकही त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. 
 
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, ठिकठिकाणी नियमितपणे होणा-या लसीकरणात वृद्धजन, दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणास प्राधान्य दिले जात आहे. त्याचबरोबर, दिव्यांगासाठीच्या शाळा, वसतिगृहे, पुनर्वसन केंद्रे, निवासी संस्था आदी ठिकाणी दर शनिवारी विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात यावे. लसीकरण केंद्रांवर टोकन सिस्टीम सुरु केल्यामुळे नागरिकांची गर्दी टळून त्यांच्या वेळेचीही बचत होत आहे. लसीकरण कार्यक्रमाला गती देण्यासाठी शिबिर मोडवर काम करणे आवश्यक आहे. त्यानुसार गॅस एजन्सी कर्मचारी, बँक कर्मचारी अशा विविध क्षेत्रांसाठी शिबिरांचे नियोजन करावे. कोरोना प्रतिबंधासाठी आघाडीवर कार्यरत आशा सेविका, आरोग्यसेविकांना मास्क आदी सामग्री नियमितपणे उपलब्ध करुन द्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

पावसाळ्यापूर्वी बीएमसीचा मोठा निर्णय, १९१ कोटी रुपयांची आधुनिक ड्रेनेज यंत्रे खरेदी केली जाणार

LIVE: पुण्यात आजपासून १४ दिवसांची जमावबंदी

सावधान! नाशिकमध्ये प्रसाद म्हणून दारू देणाऱ्या ढोंगी बाबाचा कट उघड; २ एकर शेती आणि लाखांची फसवणूक

मीरा रोडमध्ये हिंसाचार, बकरीद शेडवरून वाद पेटला

पुण्यात आजपासून १४ दिवसांची जमावबंदी! पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय; परिपत्रक जारी

पुढील लेख
Show comments