Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट: एक पक्ष, दोन व्हीप बुधवारी शक्तिप्रदर्शन

ajit panwar
, बुधवार, 5 जुलै 2023 (07:44 IST)
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाच्या मातब्बर नेत्यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून, दोन्ही गटांनी पक्षावर दावा सांगितला आहे. त्यासाठी दोन्ही गटांनी उद्या आमदार, खासदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्षांच्या बैठका मुंबईत बोलावल्या आहेत. त्यामुळे आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही गटांनी शक्तिप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी केली आहे. अजित पवार यांच्या पाठीशी किती आमदार आहेत, हे आज स्पष्ट होणार असून, दोन्ही बाजूंनी व्हीप काढण्यात आला आहे. मात्र, यामुळे आमदार, पदाधिकारी पेचात सापडले आहेत.
 
अजित पवार यांनी वांद्रे येथे बैठक बोलावली आहे, त्यासाठी प्रतोद अनिल पाटील यांनी व्हीप जारी केला तर शरद पवार यांनी वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठक बोलावली आहे. त्यासाठी प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप जारी केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोणत्या बैठकीला जाणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दोन व्हीप जारी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मात्र सत्वपरीक्षा सुरू झाली आहे. शरद पवार की अजितदादा पवार, कुणाच्या पाठिशी उभे राहायचे, हा अनेकांना पेच पडला आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता अजित पवार यांनी एमईटी वांद्रे येथे पक्षाची बैठक बोलावली आहे तर दुपारी शरद पवार यांनी वायबी चव्हाण सेंटर येथे बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि इतर नेते कोणत्या बैठकीला हजर राहणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

India vs Kuwait: कुवेतचा पराभव करून भारत सलग दुसऱ्यांदा SAF चॅम्पियन बनला