Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रखडलेला मान्सून मुंबईसह ‘या’भागांमध्ये बरसणार

mansoon
, गुरूवार, 22 जून 2023 (21:21 IST)
मुंबई : केरळमध्येच उशिराने दाखल झालेला मान्सून आता सगळीकडेच आपला लेटमार्क देत आहे. आतापर्यंत मान्सूनने महाराष्ट्र व्यापायला हवा होता. मात्र, अद्याप मान्सूनची चाहूल न लागल्यामुळे शेतकरीदेखील चिंतेत आहे. अशात तळ कोकणात आल्यानंतर अरबी समुद्रात धडकलेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा वेग मंदावला आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेचा तडाका जाणवायला लागला. शेतकऱ्यांची कामं खोळंबलेली असताना सर्वसामान्यांनाही पावसाची आस आहे. अखेर यासर्व परिस्थितीमध्ये दिलासा देणारी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
 
मान्सून नेमका कधी सक्रिय होणार याबाबत हवामान खात्याने नवा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या किनारी पट्ट्यामध्ये सक्रिय होईल.
 
मराठवाड्यातही यामुळे ढगांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर पुढच्या दोन दिवसात म्हणजे २४ आणि २५ जूनला पावसाचा जोर वाढेल, असाही हवामान खात्याचा अंदाज आहे. सध्या मोसमी वाऱ्यांच्या प्रवासासाठी पोषक वातावरण तयार झालं असून येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मान्सून सर्वत्र सक्रिय झाल्याचे पाहायला मिळेल.
 
त्यामुळे शेतकऱ्यांनीही पावसाचा अंदाज घेत पेरणीला सुरुवात करावी, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुंबईतही पाऊस कधी पडेल? अशाच अपेक्षेत सगळेजण आहेत. अशात मान्सून सध्या मुंबईच्या उंबरठ्यावर असून २४ जून रोजी तो मुंबईत दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नरेंद्र मोदी : 'तीस वर्षांपूर्वी सामान्य व्यक्तिप्रमाणे बाहेरून व्हाईट हाऊस पाहिलं होतं'