Dharma Sangrah

धक्कादायक दोघा अल्पवयीन मुलींची सोबत आत्महत्या

Webdunia
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017 (16:34 IST)
एक दिवसापासून कॉलेज मधून बेपत्ता झालेल्या मनिषा पटले (वय १७)  आशना रोकडे (वय १७)  या दोघा मुलीनी सोबत आत्महत्या केली आहे. यामध्ये  मनिषा आणि आशना या दोघीही नागपूर येथील जरीपटक्यातील लहानुजीनगरात रहिवासी आहेत. या दोघी मैत्रिणी  दयानंद महाविद्यालयात ११ वीत शिकत होत्या. या दोघी नेहमीप्रमाणे  महाविद्यालयात जात आहोत, असे घरी  सांगून घरून निघाल्या होत्या. मात्र  रात्र झाली तरी त्या परतल्या नाहीत. त्यामुळे पालकांनी त्यांची सर्वत्र  शोधाशोध केली होती. त्यांनी त्या दोघींचे  ओळखीचे, नातेवाईक, मित्रमंडळी अशा सर्वांकडे विचारपूस केली होती. मात्र यश आले नाही. घाबरलेल्या पालकांनी जरीपटका ठाण्यात तक्र ार नोंदवली आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली होती.यामध्ये  दरम्यान, सकाळी १० च्या सुमारास कोराडी तलावात दोन मुलींचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या दोघींनी का आत्महत्या केली याचे कारण अद्याप समजू शकले नाहीती.या दोघी शाळेपासून एकमेकींच्या जवळच्या मैत्रिणी होत्या. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

बारामती निवडणुकांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, "अजितसोबत जे घडले त्यानंतर कुटुंबाने निवडणूक लढवायला नको होती.

नेपाळच्या चार जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूने हाहाकार माजवला

नागपुरात बेपत्ता पतीचा शोध महागात पडला, महिलेवर भोंदू बाबाने बलात्कार केला, आरोपीला अटक

LIVE: शरद पवार म्हणाले अजितसोबत जे घडले त्यानंतर कुटुंबाने निवडणूक लढवायला नको

अकोला येथे दोन गटांमध्ये भीषण संघर्ष, अनेक जण जखमी

पुढील लेख
Show comments