Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकचे सुनील बागुल यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड

Webdunia
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (21:53 IST)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वी नाशिकमध्ये शिवसेनेने षटकार मारला आहे. नाशिकच्या विद्यमान उपमहापौर भिकुबाई बागुल यांचे पुत्र आणि भाजपमधून पुन्हा स्वगृही परतलेले सुनील बागुल यांच्यावर शिवसेनेने उपनेतेपदाची जबाबदारी टाकलीय. विशेष म्हणजे बागुल यांचे चिरंजीव शंभू बागुल हे सध्या भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष आहेत. नाशिकला माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यानंतर हे महत्त्वाचे पद मिळाले आहे. आता बागुल यांच्यावर खांद्यावर आगामी महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते.
 
सध्या महापालिकेत शिवसेना विरोधीपक्ष म्हणून भूमिका निभावतोय. गेल्या निवडणुकीत पक्षाचे ३५ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, यंदा कमीत कमी ६७ जागा मिळवल्यास पक्ष साध्या बहुमताने तरी सत्तेत येऊ शकतो. सुनील बागुल हे शिवसेनेचे निष्ठावान सैनिक आहेत. त्यांनी आयुष्यातील सर्वाधिक काळ शिवसेनेत घालवला. मात्र, पक्ष आणि त्यांच्यात दुरावा वाढला. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस आणि तदनंतर भाजपकडे वळवला. मात्र, या दोन्ही ठिकाणे ते म्हणावे तसे रमले नाहीत. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे साधारणतः वर्षाच्या अगोदर बागुल पुन्हा स्वगृही परतले. त्यामुळे त्यांच्याकडे कोणती जबाबदारी दिली जाणार, याची उत्सुकता शिवसैनिकांमध्ये होती. अखेर ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उपनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवाय महापालिकेवर भगवा फडकावण्याची जबाबदारीही बागुल यांच्या खांद्यावर टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. ही महत्त्वाची खेळी आहे.
 
बागुल यांनी शिवसेनेत असताना महानगरप्रमुख तसेच विविध पदे भूषविली आहेत. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेनेचे उमेदवारही होते. नाशिकच्या उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे नाव म्हणूनही त्यांची ओळख आहे. सध्या ते श्रमिक सेना तसेच रिक्षा, टॅक्सी चालक युनियन व कामगार संघटनांचे नेतृत्व करतायत. पंचवटी परिसरातील रामवाडी भागातून त्यांच्या घरातील सदस्य सातत्याने महापालिकेत नगरसेवक आहेत. शिवाय शिवसेनेत दीर्घकाल घालवला असल्याने सगळ्या नाड्या त्यांना ठाऊक आहेत. हे पाहता त्यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: संविधानिक संस्थेचा अपमान करणे ही काँग्रेसची सवय म्हणाले शहजाद पूनावाला

काँग्रेसला संविधानिक गोष्टींचा अपमान करण्याची सवय आहे-शहजाद पूनावाला

नायजर नदीत बोट उलटल्याने 27 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक बेपत्ता

गावावरून परतल्यानंतर महायुतीच्या बैठकीला हजेरी लावणार एकनाथ शिंदे, आज घेणार मोठा निर्णय

कॅन्सरचे ऑपरेशन करताना महिलेच्या पोटात राहिली कात्री, 2 वर्षानंतर उघडकीस आले

पुढील लेख
Show comments