Festival Posters

सुषमा अंधारेंची तब्येत बिघडली

Webdunia
शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 (08:09 IST)
जळगाव:शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांची अचानक तब्येत बिघडली आहे. त्यांची शुगर लेव्हल कमी झाल्याने त्यांचा रक्तदाब देखील कमी झाला. यानंतर डॉक्टर त्यांच्या हॉटेलमध्ये दाखल झाले आणि सुषमा अंधारे यांची तपासणी केली. स्वत: अंधारे यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. 
 
सुषमा अंधारेंच्या महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात आज मुक्ताईनगरमध्ये सभा आयोजित केली होती. पण, पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारल्यानंतर, त्यांनी ऑनलाइन सभा घेण्याचे ठरवले. पण, सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अंधारेंनी ऑनलाइन सभा घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शरीराची शुगर लेव्हल अचानक कमी झाल्याने त्यांनी ऑनलाइन सभा रद्द केली. 
 
सुषमा अंधारेंच्या गाडीला पोलिसांचा गराडा
सुषमा अंधारेंच्या सभेमुळे जळगावातील मुक्ताईनगरमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. पोलिसांनी सभेला परवानगी नाकरल्यानंतरही अंधारे सभास्थाळाकडे निघाल्या होत्या. पण, के प्राईड हॉटेलमधून सभास्थळी जाण्यास निघाल्या असता, शेकडो पोलिसांनी त्यांच्या गाडीला वेढा देऊन रोखले. यावेळी सुषमा अंधारे चांगल्याच संतापल्या. 'मी दहशतवादी आहे की गुंड? माझा नेमका गुन्हा काय आहे?' अशी विचारणा त्यांनी केली.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

Subhash Chandra Bose Jayanti नेताजी सुभाष जयंती भाषण मराठीत

LIVE: मुंबईनंतर आता चंद्रपूरमध्ये काँग्रेसने हॉटेल राजकारणाचा अवलंब केला, महिला नगरसेवक कैद

BMC Mayor Reservation Lottery बीएमसीमध्ये सत्तेची लढाई रंजक बनली ! महापौरपद "खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी" राखीव ठेवण्यात आले

शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांवर राज ठाकरे यांचा संताप

सख्ख्या भावाने त्याच्या ९ वर्षांच्या बहिणीला गर्भवती केले? व्हायरल झालेल्या बातमीची तथ्य तपासणी, सत्य काय आहे?

पुढील लेख
Show comments