राजू शेट्टी यांनी विधानसभेला स्वाभिमानी शेतकरी संघटना 49 जागा लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यात दोन दिवसीय कार्यकारणीची बैठक झाली त्यात हा ठराव संमत केला आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रस-राष्ट्रवादी आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा सोडल्या होत्या. सांगली आणि हातकंणगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीसाठी सोडण्यात आले मात्र या दोन्ही मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पराभवाचा सामना सहन करावा लागला. खुद्द राजू शेट्टी यांनी हातकंणगलेमध्ये पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे विधानसभेची रणनीती ठरविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 49 जागांवर तयारी सुरु केल्याचं सांगण्यात येत आहे.