Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिक्षकाचे बस मध्येच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

Webdunia
गुरूवार, 19 जानेवारी 2023 (08:38 IST)
मूळचे परभणी जिल्ह्यातील आणि सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरमळे देऊळ प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले हरिभाऊ रामभाऊ घोगरे (५३) हे शिक्षक गावाकडून येत असताना गोवा कदंबा बस मध्येच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाल्याची दुर्दैवी घटना कणकवली तालुक्यातील फोंडा दरम्यान घडली.
 
हरिभाऊ घोगरे सरमळे शाळेत तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्यांनी डेगवे मोयझर शाळेत त्यांनी सेवा बजावली. सोमवार आणि मंगळवार अशी दोन दिवस सुट्टी घेऊन ते शनिवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कान्हा या आपल्या गावी गेले होते. आपल्या गावाकडून ते मंगळवारी रात्री कोल्हापूरपर्यंत आल्यानंतर ते बुधवारी सकाळी मिरज – पणजी या कदंबा गाडीने येत होते. ही बस फोंड्यादरम्यान आली असता हरिभाऊ घोगरे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तात्काळ त्यांना फोंडा प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
 
Edited by :  Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

IPL 2024: मुंबई इंडियन्स संघाने दिल्लीविरुद्ध विजय मिळवून इतिहास रचला

माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मोठा दिलासा! हायकोर्टाच्या जन्मठेपेच्या निर्णयाला स्थगिती

ना भुजबळ, ना गोडसे" ; नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा वाढला ; नव्या ३ नावांची चर्चा

गुढी पाडव्याच्या दिवशी मविआचे जागावाटप होणार; पवार-ठाकरे-पटोले फॉर्म्युला सांगणार

बिझनेस वाहिनीवर शेअर्सच्या टिप्स देणं पडलं महागात! काय आहे प्रकरण?

शेअर बाजाराने इतिहास रचला! BSE बाजार भांडवल पहिल्यांदाच ४०० लाख कोटींवर

चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सचा सात गडी राखून पराभव केला

गुढीपाडवा : शालिवाहन शके काय आहे? ते कोणी आणि कधीपासून सुरू केलं?

Sikkim Election : एसडीएफला भाईचुंग भुतियाच्या माध्यमातून पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास, 19 एप्रिलला निवडणुका होणार

निवडणूक आयोगाने दोन राज्यांतील मतमोजणीची तारीख बदलली, अरुणाचल आणि सिक्कीममध्ये 2 जून रोजी मतमोजणी

पुढील लेख
Show comments