suvichar

ठाणेकर तुमचे पाणी महागले, सांभाळून वापर करा

Webdunia
मंगळवार, 11 डिसेंबर 2018 (09:22 IST)
पावसाने फार कमी वेळ दिल्याने मुंबई शहर आणि उपनगरवासियांना पाणीकपातीस सामोरे जावे लागणार आहेत्क. सोबतच  ठाण्याला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात ५० टक्के वाढ करण्यात येणार आहे. परिणामी, ठाणेकरांचे पाणी चांगलेच  महागणार असून, महत्त्वाचे म्हणजे मुंबईला ठाण्यातील धरणांमधूनच पाणीपुरवठा होतो आहे.  ठाण्याच्या भरवशावरच तहान भागवायची आणि ठाणेकरांवरच दरवाढ लादायची, असा हा प्रकार असल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मुंबई महापालिकेने घेतलेल्या या दरवाढ करत , या  निर्णयामुळे वर्षागणिक १४.५८ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. जवळपास  १५ वर्षांनंतर ही दरवाढ करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईसाठी दररोज ३,८०० दशलक्ष लीटर पाणी लागते. मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार आणि तुलसी या सात धरणांतून हा पाणीपुरवठा केला जातो. यामधील १५० दशलक्ष लीटर पाणी हे ठाणे आणि भिवंडीला दिले जाते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

पुण्यातील हडपसर येथे बॉम्बसारखी एक संशयास्पद वस्तू आढळल्याने रुग्णालयाजवळ घबराट पसरली

गुरुदेवांच्या ७० व्या जन्मोत्सवनिमित्त जागतिक शांततेचा संदेश; १८२ देशांतील लाखो लोकांनी सामूहिक ध्यानात सहभाग घेतला

‘महालक्ष्मी सरस २०२६’ हे यावर्षी संपूर्ण राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रदर्शनांपैकी एक म्हणून उदयास आले

मोदी सरकारने साखर निर्यातीवर बंदी घातली; साखर कारखाने आणि जागतिक बाजारपेठेवर काय परिणाम होईल?

२००८ च्या रेल्वे भरती हिंसाचार प्रकरणात राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर, सर्व आरोप फेटाळले

पुढील लेख
Show comments