Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जळगाव जिल्ह्यातील नदीपात्रात अडकलेल्या नऊ पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनास यश

Webdunia
मंगळवार, 19 जुलै 2022 (15:10 IST)
जळगाव रावेर तालुक्यातील सुकी नदीपात्रात सायंकाळी अडकलेल्या नऊ पर्यटकांना चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनास यश आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सुखी (गारबर्डी) धरणाचा वेस्ट वेअर ओसंडून वाहत असून या जलप्रवाहाच्या विळख्यात ९ पर्यटक अडकल्याची माहिती सायंकाळी 6.30 वाजता स्थानिकांनी प्रशासनाला दिली. हे नऊ पर्यटक नदीच्या मधोमध उभे असून पाण्याचा वेढा त्यांच्या दोन्ही बाजूने पडला आहे.
 
तसेच पाण्याचा प्रवाह वाढतच असल्याने हे सर्व जण वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बेहरे, सावदा येथील उपविभागीय अभियंता यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला देऊन बचाव कार्य तातडीने उपलब्ध करून देण्याची विनंती केली. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना मिळताच त्यांनी फैजपूर चे प्रांताधिकारी कैलास कडलग आणि रावेरच्या तहसिलदार उषाराणी देवगुणे यांना बचाव साहित्यासह घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर सतत सुरू असलेला पाऊस तसेच नदीपात्रात वाढत जाणारे पाणी ही बाब लक्षात घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत मिळण्यासाठी मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षास संपर्क साधण्यात आला. त्यानुसार धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडीही घटनास्थळाकडे रवाना झाली.
 
प्रांताधिकारी कडलग आणि तहसिलदार श्रीमती देवगुणे यांनी स्थानिक नागरिक तसेच पोहणारे १ इम्रान शहा रतन शहा रा. पाल२ संतोष दरबार राठोड रा.पाल ३ रतन भंगी पावरा रा.गारखेडा ४ तारासिंग रेवलसिंग पावरा रा.गारबर्डी५ सिद्धार्थ गुलजार भिल यांच्या मदतीने मुक्ताईनगर येथील या नऊ पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले. यासाठी त्यांना स्थानिक आमदार शिरीष चौधरी, रावेर तहसील कार्यालय, सावदा पोलीस स्टेशन, प्रांत कार्यालय फैजपूर, वन्यजीव अधिकारी व कर्मचारी आदीचे सहकार्य लाभले.
 
सुकी नदी पात्रात अडकलेल्या व सुटका झालेल्या व्यक्ती
1 अतुल प्रकाश कोळी 20
2 विष्णू दिलीप कोलते १७
3 आकाश रमेश धांडे २५
4 जितेंद्र शत्रुघ्न कूंडक ३०
5 मुकेश श्रीराम धांडे १९
6 मनोज रमेश सोनावणे २८
7 लखन प्रकाश सोनावणे २५
8 पियूष मिलिंद भालेराव २२
9 गणेशसिंग पोपट मोरे २८
सर्व रा. मुक्ताईनगर
 
या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी दिली आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात खात्यांची विभागणी झाली, अजित पवार यांच्याकडे पुन्हा वित्त,गृहखाते मुख्यमंत्री फडणवीस आणि नगरविकास शिंदे यांच्याकडे आले

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात खात्यांची विभागणी झाली, अजित पवार यांच्याकडे पुन्हा वित्त, गृहखाते मुख्यमंत्री फडणवीस आणि नगरविकास शिंदे यांच्याकडे आले

पंजाबमधील मोहालीमध्ये तळघर खोदकाम सुरू असताना इमारत कोसळली

मंदिराच्या दानपेटीत भक्ताचा आयफोन पडला, मागितल्यावर परत करण्यास नकार जाणून घ्या प्रकरण

ॲमेझॉन अंबरनाथ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात दाखल होणार

पुढील लेख
Show comments