Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावात मृतदेह ताडकन उभा राहिला…

Webdunia
रविवार, 25 एप्रिल 2021 (08:45 IST)
झाडाखाली एक जण मृत अवस्थेत पडल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली, पाहता पाहता लोक गोळा झाली, काही वेळ त्या व्यक्तीची हालचाल बंद असल्याने त्याला मृत घोषित केले मात्र क्षणात त्या माणसाची हालचाल सुरू झाली आणि मग काय लोकांनी मेला म्हणून सोडून दिलेला मृतदेह चक्क उभा राहिला. राहाता तालुक्यात केलवड हे गाव आहे.
 
गावापासून काही अंतरावर शिर्डी बायपासवर एका चिंचेच्या झाडाखाली एक व्यक्ती दोन दिवसांपासून निपचित पडून असल्याचे काही गावकऱ्यांनी पाहिले. त्यांना ती व्यक्ती मरण पावली असावी, असा संशय आला. त्यांनी ही माहिती पोलिस पाटील सुरेश गमे यांना दिली. गमे यांनी ही माहिती राहाता तालुका पोलिसांनी कळविली. गावात बेवारस मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुभाष भोये आपल्या सहकाऱ्यांसह तेथे दाखल झाले.त्या कथित मृतदेहाची पाहणी सुरू झाली. सुमारे ५५ वर्षांच्या या व्यक्तीने पँट शर्ट घातलेला होता. दाढी वाढलेली होती. पोलिस नाईक पंकज व्यवहारे, पोलिस नाईक चंद्रकांत भोंगळे व इफ्तिकार सय्यद यांनी जवळ जाऊन पाहणी केली.
त्यावेळी व्यवहारे यांना त्या व्यक्तीच्या डोळ्यांची हालचाल झाल्याचे जाणवले. त्यामुळे हा मृतदेह नसून जिवंत व्यक्ती असल्याची खात्री पटली. त्यामुळे तातडीने हालचाली सुरू झाल्या. त्या व्यक्तीला पाणी पाजण्यात आले.त्यामुळे अंगात त्राण आल्याने ती व्यक्ती उठून बसली. आपल्याभोवती जमलेली गर्दी, आलेले पोलिस पाहून भांबावून गेल्याने थोडी शुद्ध येताच ती व्यक्ती तडक उठून उभी राहिली.मग पोलिसांनी विचारपूस सुरू केली.
त्या व्यक्तीने आपले नाव पंकज चंद्रकांत सोनवणे (वय ५५, रा. अंमळनेर, जि. जळगाव) असे सांगितले. रेल्वेत लेखा विभागात नोकरीला असल्याचे सांगितले. त्याच्या खिशात मोबाईल, नाव, पत्ता सापडला. त्यावरूनही खात्री पटली.

संबंधित माहिती

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments