Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खून करून मृतदेह जाळला, 11 वर्षांनंतर आरोपी गजाआड केला,अशी पटली ओळख

Webdunia
शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (21:29 IST)
ड्रायव्हरचा खुन करून मृतदेह सिंधखेड राजा (जि. बुलढाणा) येथे जाळुन पुरावा नष्ट केला आणि 11 वर्ष ओळख लपवुन राहिला. तो आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर जेरबंद केला, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली.
 
अभिमान ऊर्फ भरत मारूती सानप असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पाथर्डी पोलीस ठाण्यात 2011 साली फिर्यादी नितीन सखाराम सोनवणे यांनी फिर्याद दिली.
फिर्यादीचा भाऊ अनिल सोनवणे यास जबर मारहाण व घातपात करण्यासाठी अपहरण करून ट्रक मधील पाच लाख 48 हजार 940 रूपयांची बायडींग वायर बळजबरीने चोरुन नेली आहे.
गुन्हा भरत मारूती सानप (रा. खडकवाड जि. बीड) हा स्वतःचे नावात बदल करून व ओळख लपवुन राहत आहे, अशी माहिती तपास पथकास मिळाल्याने त्यांनी आरोपीचा शोध घेवून त्यास कन्हेरवाडी (ता. परळी जि. बीड) येथुन ताब्यात घेतले.
 
त्याने त्याचे नाव अभिमान मारूती सानप असे चुकीचे सांगितले. पोलिसांनी खाक्या दाखविताच अनिल सोनवणे याला मारून सिंधखेड राजा येथे ट्रकमधील अंथरून व पांघरून घेण्याचे कपडे व नाल्या जवळील सुकलेले गवत त्याचे अंगावर टाकुन त्यास पेटवुन देवुन तेथुन निघुन आलो, अशी कबूली त्याने दिली.
 
अशी पटली ओळख – गुन्हे शाखेच्या पथकाने भरत सानपला ताब्यात घेतले, परंतू तो अभिमान मारुती सानप असे चुकीचे नाव सांगुन उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.
 
तसे आधारकार्ड पोलिसांना सादर केले. परंतु तपास पथकाची पुर्णखात्री होती की, सदरचा इसम हाच भरत मारुती सानप आहे.
त्यामुळे पथकाने त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे कसुन चौकशी करता त्यांचेकडे असलेल्या ओळखी बाबतच्या कागदपत्रांची सखोल पडताळणी केली.
त्यामध्ये त्याचेकडे सन 2006 मधील मतदान ओळखपत्र सापडले त्यावर त्याचे नाव भरत मारुती सानप असे असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी त्याचा सातबाराही तपासला त्यावर देखील भरत मारूती सानप नाव आढळून आले. मीच भरत मारुती सानप असे असल्याचे सांगुन त्याने गुन्ह्याची कबूली दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

मुंबईतील सोन्या-चांदीचे आजचे दर जाणून घ्या

धोनी चेन्नईत शेवटचा सामना खेळणार!CSK सीईओ विश्वनाथयांचा खुलासा

हिंदूंना नाही तर भाजपला धोका आहे, असे का म्हणाले विजय वडेट्टीवार?

उद्धव ठाकरेंच्या 2 दिवसांत दोनदा तपासण्यांमुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलं, निवडणूक आयोग म्हणाला- शहा आणि नड्डा यांचीही चौकशी झाली

24 तासांत दुसऱ्यांदा तपास, शिवसेना यूबीटी नेते उद्धव ठाकरे संतापले

पुढील लेख
Show comments