Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह कोणाला मिळणार,याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार

Webdunia
बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (08:54 IST)
खरी शिवसेना कोणाची आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह कोणाला मिळणार,त्यामुळे ‘धनुष्यबाण’ हे शिवसेनेचं चिन्ह कोणाला मिळणार, याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. मात्र, खरी शिवसेना कोणाची आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह कोणाला मिळणार, याबाबत निवडणूक आयोग कशाच्या आधारे निर्णय घेणार, असा प्रश्न पडला आहे. त्यात आता निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
 
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राजीव कुमार म्हणाले, “शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता द्यावी अथवा चिन्हावरती निर्णय देताना पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात येईल. शिवसेनेच्या बाबतीत ‘बहुमताच्या आधारे’ चाचपणी करून निर्णय घेतला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचल्यानंतर यावरती कारवाई करू,” असेही राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. एका वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावत, शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यापासून रोखलं जावं, अशी मागणी ठाकरेंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

ठाणे : वेश्याव्यवसायात अडकल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल, तरुणीची सुटका

नौदलाच्या पाणबुडीला मासेमारीची बोटची धडक दोघांचे मृतदेह बाहेर काढले

LIVE: महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतला

महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतला

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला गुजरात एटीएस ने अटक केली

पुढील लेख
Show comments