Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे ऑल ईज वेल नसून नथिंग ईज वेल - धनंजय मुंडे

Webdunia
गुरूवार, 20 जून 2019 (10:17 IST)
राज्यपालांच्या अभिभाषणाचा प्रस्ताव आज विधान परिषदेत अनिल परब यांनी मांडला. महाराष्ट्राच्या अवस्थेमध्ये आणि अनिल परब यांच्या अवस्थेमध्य़े काही फरक नाही, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी लागावला..
 
राज्यपालांचा आम्ही आदर करतो. राज्यपालांनी अभिभाषण इंग्रजीमध्ये मांडले. पण हे अभिभाषण म्हणजे ऑल ईज वेल नसून नथिंग ईज वेल आहे, असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले. भाजपा सरकारने राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर लोकसभा निवडणूक जिकंली. वास्तविक पाहता आघाडीच्या कार्यकाळात पाकिस्तानला तीन वेळा युद्धात हरवले गेले, नक्षलवाद राष्ट्रवादी सरकारनेच संपवला पण राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर कधी मते मागितली नाहीत, असेही मुंडे म्हणाले.
 
ईव्हीएमवरील सभागृहातील बोलणं रेकॉर्डवरुन काढण्याचा आग्रह सरकार करत आहे. ईव्हीएमला विरोध याआधी लालकृष्ण अडवाणी, स्व. अटलबिहारी वाजपेयी आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील केला होता, मग आम्ही विरोध केला तर काय चुकलं? असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला.
 
सरकारने अर्थसंकल्पात जनतेला काय दिले? उलट राज्य सरकारच्या नेतृत्वात राज्य किती कर्जबाजारी झालं हे जाहीर व्हायला हवं होतं. सरकारच्या कट-कारस्थानामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला, दुधाचे अनुदान बंद केले, शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्यांना फसवणारे असे हे सरकार आहे.
 
भाजपा सरकारच्या काळात बेरोजगारीचे प्रमाणाने उच्चांक गाठला आहे. ७२ रिक्त जागा सरकार ८ महिन्यांत भरू शकले नाही तर ७२ हजार जागा कशा भरणार? असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला. प्लास्टिक बंदी अजुनही झालेली नाही. मेक इन इंडिया योजना फसली. स्व. गोपीनाथ मुंडेंच्या नावाने सुरू केलेले ऊसतोड महामंडळ सरकारने बंददेखील केले. या सरकारच्या काळात भ्रष्टाचार करणारे १६ मंत्री फक्त खऱ्या अर्थाने श्रीमंत झाले, असा टोला मुंडे यांनी लगावला.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

चंद्रशेखर बावनकुळे विरोधकांना प्रतिउत्तर देत म्हणाले- लोकसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये कोणतीही गडबड न्हवती

LIVE: फ्रॉड आहे EVM मशीन म्हणाले संजय राऊत

या देशात फ्रॉड आहे EVM मशीन, महाराष्ट्र निवडणूक निकालावर म्हणाले संजय राऊत

नागपुरात पार्क केलेल्या क्रेनला रिक्षाची धडक, दोन महिलांचा मृत्यू

ठाण्यामधील भिवंडी मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

पुढील लेख
Show comments