Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विमान उड्डाणाला मान्यता नसल्याचा संदेश आदल्याच दिवशी पाठवला होता

विमान उड्डाणाला मान्यता नसल्याचा संदेश आदल्याच दिवशी पाठवला होता
, गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (20:19 IST)
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमानाने प्रवास परवानगी नाकारल्या प्रकरणी आपण दुसऱ्या विमानाने आलो अशी प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री सचिवालयाकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राज्यपाल सचिवालयानं विमान उपलब्धतेची खातरजमा करायला हवी होती असं मुख्यमंत्री सचिवालयाकडून सांगण्यात आलं आहे. तसंच विमान उड्डाणाला मान्यता नसल्याचा संदेश आदल्याच दिवशी पाठवण्यात आला होता अशी माहिती देण्यात आली आहे.
 
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सरकारी कामासाठी उत्तरखंडला जाणार होते. लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या १२२ व्या इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्रॅमच्या व्हॅलेडिक्टरी प्रोग्रॅमला ते हजेरी लावणार होते. राज्यपाल ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळावर पोहोचले होते. राज्यपाल सचिवालयानं २ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून विमान प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली होती. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्य सरकारकडून शिवजयंती साजरी करण्यासाठी नियमावली जाहीर