Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घाटकोपरच्या जोडप्याच्या मृत्यूमागचं गूढ वाढलं

घाटकोपरच्या जोडप्याच्या मृत्यूमागचं गूढ वाढलं
Webdunia
शुक्रवार, 10 मार्च 2023 (21:05 IST)
मुंबईतल्या घाटकोपरमध्ये बुधवारी म्हणजेच ८ मार्चला एक विवाहित जोडपं त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळलं. या दोघांचेही मृतदेह त्यांच्याच घरातल्या बाथरूममध्ये सापडले. या दोघांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मुंबईत्या घाटकोपर या ठिकाणी झालेली ही घटना आहे. घाटकोपरच्या पंतनगर भागात असलेल्या कुकरेजा टॉवरमध्ये हे दाम्पत्य मृतावस्थेत आढळलं होतं. आता पोलिसांच्या हाती एक माहिती लागली आहे. मात्र त्यामुळे दीपक शाह आणि रीना शाह या दोघांच्याही मृत्यूचं गूढ वाढलं आहे.

रीना शहा आणि दीपक शहा यांच्याकडे काम करण्यासाठी येणारी गृहसेविका त्यांच्या घरी दुपारी १२ च्या दरम्यान आली. तिने बेल वाजवली पण कुणीही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर तिने रीना यांचा नंबरही डायल केला. तिला मोबाइल वाजत असल्याचं बाहेर ऐकू येत होतं पण कुणीही फोन उचलत नव्हतं आणि दारही उघडत नव्हतं. तिला या बाबत काळजी वाटली त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या गृहसेविकेने दीपक यांच्या आई कांताबेन यांना फोन केला अशी माहिती पंतनगर पोलिसांनी दिली आहे. कांताबेन यांना फोन केल्यानंतर हा प्रकार पोलिसांनाही कळवण्यात आला. पोलिसांनी घरात जाऊन पाहिलं तेव्हा या दोघांचे मृतदेह बाथरूममध्ये आढळून आले.

मृत्यूची पाच कारणं असू शकतात असं फॉरेन्सिक तज्ज्ञांचं म्हणणं
या दोघांच्या मृत्यूची चार कारणं असू शकतात असं कलिना फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. १) हृदयविकाराचा तीव्र झटका २) अन्ननलिका आणि फुफ्फुसांमध्ये अन्नाचे कण अडकून फुफ्फुसांना सूज आलेली असू शकते त्यावर उपचार न झाल्याने या दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता. ३) दोघंही सुरूवातीला बेशुद्ध झाली असतील आणि त्यांच्या मेंदूपर्यंत रक्तपुरवठा योग्य प्रमाणात झाला नसेल. ४) व्हायग्राचा ओव्हरडोस या कारणांमुळे या दोघांचा मृत्यू झालेला असू शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मिड डे ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.



Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

कुणाल कामरा जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्याला सोडणार नाही शिवसेना नेते संजय निरुपम यांची टीका

DC VS LSG: पंतच्या नेतृत्वाखाली एलएसजीला पहिला पराभव

LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून 8 एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

औरंगजेब वाद: छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून 8 एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

इजिप्तच्या नवीन युद्धबंदी प्रस्तावादरम्यान इस्रायलचे गाझावर हल्ले, 61 जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments