Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या भाविकांना पोलिसांनी केले “हे” आवाहन

Webdunia
गुरूवार, 17 ऑगस्ट 2023 (21:19 IST)
जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे 20 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत श्रावण सोमवार निमित्त यात्रेसाठी सुमारे दोन ते तीन लाख भाविक दर्शनासाठी व प्रदक्षिणेसाठी येतात. यात्रा काळात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागामार्फत करण्यात येत असलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) शहाजी उमाप यांनी केले आहे.
 
यात्रा काळात भाविकांनी खालील सुचनांचे करावे पालन
 
▪️ भाविकांनी आपल्या सोबत कमीत कमी सामान आणावे
▪️ यात्रेकरूने आपल्या सोबत मौल्यवान चीज वस्तू आणु नये.
▪️ मंदिरात भाविकांना बॅगस् व पिशव्या इत्यादी नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
▪️ यात्रेत कोणतीही बेवारस अगर संशयित वस्तु आढळून आल्यास स्पर्श न करता त्वरीत पोलीसांच्या निदर्शनास आणावे.
▪️ कोणतीही संशयास्पद व्यक्ती संशयास्पद हालचाली करीत असल्यास याबाबत पोलीसांच्या निदर्शनास आणावी.
▪️ भाविकांनी आपली वाहने पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करावीत
▪️ यात्रेत कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोणी जाणुन-बुजुन अफवा पसरवत असल्यास तसे पोलीसांना तात्काळ कळविण्यात यावे.
 
वरील सर्व सुचनांचे नागरिकांनी पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) शहाजी उमाप यांनी केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पोर्शे कार अपघातात सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्व शरद पवारांनी राहुल गांधींची घेतली भेट

शरद पवारांकडून राहुल गांधींना पंढरपूर वारीला येण्याचे निमंत्रण

हाथरस घटनेबद्दल खासदार प्रियंका चतुर्वेदींचा मोठा जबाब, 'सत्संग करण्याऱ्या बाबांवर देखील...'

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पात्रतेच्या अटी बदलल्या, अर्जाची तारीखही वाढवली, जाणून घ्या नवे बदल

सर्व पहा

नवीन

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन

संत नामदेव महाराज

मुंबईचा गोखले ब्रिज झाला तयार, BMC ने सुधारली चूक ज्यावर उठला होता विनोद

Sensex : शेअर बाजारात सेन्सेक्सने पहिल्यांदा 80 हजारांचा टप्पा पार केला, निफ्टी 24300 च्या जवळ

महाराष्ट्र : प्रत्येक महिन्याला शेतकरी करीत आहे आत्महत्या, या वर्षी 1046 शेतकऱ्यांनी दिले आपले प्राण

पुढील लेख
Show comments