rashifal-2026

म्हणून चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा

Webdunia
बुधवार, 16 डिसेंबर 2020 (16:38 IST)
कोल्हापूर भाजपामधील वाद समोर आला आहे. यातूनच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा व हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले आहे. विधान परिषदेच्या पदवीधर शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. 
 
“सत्तेत असताना चंद्रकांत पाटील यांनी इतर पक्षात फोडाफोडी करून अनेकांना भाजपात घेतले. पण जुन्या जाणत्यांना डावलून नव्याने व इतर पक्षांतुन आलेल्यांनाच अनेक पदे दिली. दोघांनीही या निवडणुकीत भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही. एकतर्फी विजय मिळेल असा त्यांना विश्वास होता. बाहेरून आलेल्या लोकांवर विश्वास ठेवला. पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक गांभीर्याने घेतली नसल्याने भाजपचा पराभव झाला.त्यामुळे या पराभवाची जबाबदारी घेऊन पाटील व घाटगे यांनी राजीनामा द्यावा,” असा घरचा आहेरच भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. “आम्ही पक्षातून बाहेर पडलो नाही. पुढील निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी पक्ष सक्षम असला पाहिजे ही भूमिका बऱ्याच कार्यकर्त्यांची आहे,” असेही शिवाजी बुवा आणि पीड पाटील म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी आजपासून नामांकन सुरू

LIVE: संदीप नाईक यांचे भाजपमध्ये पुनरागमन

या दिग्गज क्रिकेटपटूच्या वडिलांचे निधन

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबई भाजपने 'वॉर रूम' आणि निवडणूक कार्यालय सुरू केले

नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल सुप्रिया सुळे यांनी आपले मत मांडले

पुढील लेख
Show comments