Festival Posters

Samruddhi Highway Accident चालकाला डुलकी लागल्याने भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 25 जानेवारी 2024 (11:20 IST)
समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway ) वर पहाटे 5 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. चालकाला डुलकी लागल्याने कंटेनरच्या बाजूला जाऊन धडकल्याने हा भीषण अपघात झाला. 
 
ही घटना अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अहमदनगरहून रायपूरकडे जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हल्सची बाजूच्या कंटेनरला धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. अमरावती जिल्ह्यातील गगोना शिवणी दरम्यान 128 वाहिनीवर हा अपघात झाला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. काही जखमी आहेत.
 
अपघातातील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या अपघाताचा पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस करत आहेत. समृद्धी महामार्गावर अपघात सुरूच आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments