Marathi Biodata Maker

समृद्धी महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 (11:32 IST)
समृद्धी महामार्गावर कार ने कंटेनरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली आहे. 
उभ्या कंटेनरला समृद्धी महामार्गावर भरधाव येणाऱ्या कार ने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.मयत तिघे जालना जिल्ह्यातील आहे.  

सदर घटना समृद्धी महामार्गावर धोत्रे ग्राम पंचायतीच्या हद्दीत घडलाय आहे. या ठिकाणी एक नादुरुस्त कंटेनर उभा होता. शिर्डीच्या दिशेने  भरधाव जाणाऱ्या कारच्या चालकाला उभ्या कंटेनरच्या अंदाज आला नाही आणि कार ने जोरदार धडक दिली . या अपघातात तिघांचा मृत्यू  झाला. राहुल राजभोज, उमेश उगले, आणि भाऊसाहेब पैठणे अशी मयतांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून पुढील तपास करत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

LIVE: भीषण रस्ते अपघातात माजी आमदार निर्मला गावित गंभीर जखमी

T20 World Cup 2026 Schedule: टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

बिहार: भीषण रस्ते अपघातात सहा जणांचा मृत्यू

नाशिक : निर्मला गावित यांना कारने धडक दिली; माजी आमदार गंभीर जखमी

न्यूज अँकरने ऑफिसमध्येच गळफास घेतला

पुढील लेख
Show comments