Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

द्वारका ते नाशिकरोड वाहतूक कोंडी सुटणार ; पालकमंत्र्यांनी काढला हा मार्ग

Webdunia
गुरूवार, 10 ऑगस्ट 2023 (08:25 IST)
Traffic congestion from Dwarka to Nashik Road नाशिक रोड ते द्वारका हा पुणे-नाशिक, राष्ट्रीय महामार्गाचा एक भाग असून त्यावर मोठ्या प्रमाणात नागरी वाहतुकीसह अवजड वाहतूक होत असते.
 
या विषम वाहतुकीमुळे या 7 किमीवर अंतरावर नेहमीच अपघात आणि गर्दी होते. हे लक्षात घेवून नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार करून ही कोंडी सोडविण्यासाठी डबल डेकर फ्लायओव्हरची अंतिम मंजुरी तसेच निधी तातडीने मिळून काम सुरू होण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.
 
द्वारका ते नाशिकरोड याठिकाणी महा-मेट्रोने निओ मेट्रोचा प्रस्ताव तसेच उड्डाणपूलाचा प्रस्ताव NHAI ने दिला आहे त्यामुळे दोन्हींची सांगड घालून डबल डेकर फ्लायओव्हर होणे गरजेचे आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास वाहतूक कोंडी आणि अपघाताचे सत्र थांबणार आहे. द्वारका सर्कलमध्ये सतत गर्दी होत असते, रेल्वेस्टेशन, पुणे तसेच मुंबई – आग्रा हायवेला जोडणारे हे सर्कल असल्याने याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या नेहमीच उद्भवत असते.
 
द्वारका ते नाशिकरोड हा भाग भारत सरकारच्या सागरमाला योजनेत समाविष्ट असून, सागरमाला प्रकल्प हा भारत सरकारचा एक व्युहात्मक व ग्राहकाभिमुख प्रकल्प आहे, यामुळे उड्डाणपुलाचे काम तातडीने हाती घेणे अत्यावश्यक आहे. महामेट्रोकडे मेट्रोची अंतिम मंजुरी प्रस्तावित असून डबल डेक्कर पुलाच्या मंजूरी बाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी विनंती केली आहे.
 
नाशिकरोड – द्वारका या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास नाशिककरांची वाहतूक कोंडीची वाताहात थांबणार आहे. नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सक्रिय होत या योजनेसाठी वेळोवेळी NHAI च्या अधिकाऱ्यांशी पालकमंत्री या नात्याने बैठका घेत तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: संविधानिक संस्थेचा अपमान करणे ही काँग्रेसची सवय म्हणाले शहजाद पूनावाला

काँग्रेसला संविधानिक गोष्टींचा अपमान करण्याची सवय आहे-शहजाद पूनावाला

नायजर नदीत बोट उलटल्याने 27 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक बेपत्ता

गावावरून परतल्यानंतर महायुतीच्या बैठकीला हजेरी लावणार एकनाथ शिंदे, आज घेणार मोठा निर्णय

कॅन्सरचे ऑपरेशन करताना महिलेच्या पोटात राहिली कात्री, 2 वर्षानंतर उघडकीस आले

पुढील लेख
Show comments