rashifal-2026

कॉन्फरन्सद्वारे पत्नीला तीन तलाक

Webdunia
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020 (15:11 IST)
कांदिवली येथे राहणार्‍या एका महिलेने पतीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने कॉन्फरन्स कॉल सुरू असतानाच पतीने तीन तलाक दिल्याचा आरोप केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार महिलेचं लग्न 2018 साली झालं असून ती पतीसह कळंबोलीला राहत असताना तिचं सासरच्यांशी वाद झाल्यामुळे ती कांदवली पूर्वेला आई-वडिलांकडे आली होती. दरम्यान तिच्या बहिणीने मध्यस्थी करण्यासाठी बहिणीच्या नवऱ्याला फोन केला होता. हे तिघे कॉन्फरन्स कॉलवर बोलत असताना अचानक पीडित महिलेच्या नवऱ्याने तिला फोनवरच तीन तलाक दिल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे.
 
पीडित महिलेने सांगितले की सासरच्यांचा मागणीवर तिच्या आई-वडिलांनी जावयाला एक गाडी आणि राडो घड्याळ देखील दिले होते. काही दिवस उलटल्यावर त्याने पैसे मागायला सुरुवात केली. मानसिक आणि शारीरिक तणावामुळे तिचा गर्भपात देखील झाला. तरी सासू-सासऱ्यांनी या सगळ्यांसाठी तिला दोषी ठरवत माहेरून पैसे आणण्याची बळजबरी केली. याला कंटाळून ती आई-वडिलांकडे आली होती. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

LIVE: अजित पवार विमान अपघातानंतर मुलगा जय पवार यांनी खाजगी चार्टर कंपनीवर गंभीर आरोप केले

US-Iran conflict: कच्च्या तेलाचा दर ८२ डॉलरवर पोहोचला, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील? परिणाम जाणून घ्या

नागपूरमधील एसबीएल एनर्जी लिमिटेडमध्ये मोठा स्फोट; १८ जणांचा मृत्यू

इराणमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात २०० हून अधिक लोक ठार, ट्रम्प म्हणाले हल्ले सुरूच राहतील

साडेतीन वर्षांच्या मुलासह वडिलांची ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या, चांदवड मधील घटना

पुढील लेख
Show comments