Dharma Sangrah

जे काही बोलले त्याबद्दल जीभ हासडली असती - उदयनराजे भोसले

Webdunia
शनिवार, 15 जून 2019 (16:51 IST)
नीरेच्या पाण्यावरून रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले या दोघांमधला वाद विकोपाला गेला आहे. रामराजे यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर केलेली टीका चांगलीच जिव्हारी लागली आहे. उदयनराजे भोसले म्हणाले की रामराजे वयाने मोठे आहेत म्हणून मी अजून शांत असून, ते माझ्या वयाचे असते तर जे काही बोलले त्याबद्दल मी त्यांची जीभच हासडली असती असे प्रत्युत्तर भोसले यांनी दिले आहे. बारामतीकडे वळवलेल्या नीरा देवघरच्या पाण्यावरून दोन राजघरण्यांमध्ये जोरदार संघर्ष दिसून येतो आहे. पिसाळलेली कुत्री जोपर्यंत असतील तोपर्यंत मी पिसाळलेलाच राहणार अशी टीका राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनी केली, ज्याला उदयनराजे भोसले यांनी उत्तर देत रामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती असं उदयनराजेंनी म्हटलं आहे. या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला होता मात्र ते अपयशी ठरले आहेत, कारण त्या बैठकीतून उदयनराजे भोसले बाहेर पडले आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी तीव्र शब्दात त्यांचा आपला  संताप व्यक्त केला आहे. 
 
उदयनराजे भोसले म्हणाले की माझी तुलना पिसाळलेल्या कुत्र्याशी रामराजेंनी केली असून, त्यांच्यासारख्या मोठ्या माणसाला हे बोलणं जरा तरी शोभतं का? मी कधीही कोणाचं वाईट चिंतलेलं नाही. तरीही ते म्हणतात मी चक्रम आहे. रामराजेंनी एक लक्षात ठेवावं मी काही बांगड्या भरलेल्या नाहीत. त्यांनी  कुपोषित मुलासारखं वागू नये वेळ पडली तर जशास तसं उत्तर देण्याची आमची तयारी आहे. मात्र  आमच्यावर असे संस्कार अजिबात नाहीत. मी काय बोललो ते एकदा सगळ्यांना विचारा. रामराजे जर माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती. त्यामुळे आता हा वाद शमण्याची चिन्हे नाहीत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांसाठी पावसाचा पिवळा इशारा जारी

एमएसआरटीसीची महाआयोजना; बस डेपोमध्ये पेट्रोल बंद, आता ५०% बसेस इलेक्ट्रिक असतील

अमृतसरहून मुंबईला जाणाऱ्या गोल्डन टेंपल मेलवर छापा, २.१९ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

राज्याला अवकाळी पावसाने झोडपलं

प्रियकराने गळा चिरुन डोके कापले, मृतदेह यमुना नदीवरील पुलावर पोत्यात टाकला

पुढील लेख
Show comments