suvichar

मात्रोश्रीवर पंकज भुजबळ यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट

Webdunia
बुधवार, 9 मे 2018 (16:36 IST)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी मातोश्री येथे भेट घेतली आहे. छगन भुजबळ यांची गेल्या आठवड्यात तुरुंगातून जामिनावर सुटका झाली होती, त्यांनी रुग्णालयातून कामाला सुरुवात देखील केली आहे. मात्र या दोघांच्या भेटीने राजकारण बदलणार आहे.
 
ठाकरे - भुजबळ यांची जवळपास 15 मिनिटं  भेट झाली, या भेटीवेळी मिलिंद नार्वेकर देखील  होते. मात्र पंकज भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट होती असे सांगण्यात आले आहे. 

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते  छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत येण्याआधी शिवसेनेत होते. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शिवसेना आणि भुजबळ कुटुंबीय यांच्यातील संबंध नेहमीच राजकीयदृष्ट्या तणावाचेच राहिले आहेत. मात्र भुजबळांच्या जामिनावर सुटकेनंतर शिवसेनेने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून भुजबळांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आधीच राजकीय चर्चांना वेग आला होता. 
‘सामना’त  भुजबळांबद्दल काय म्हटले होते?

“भुजबळ शिवसेनेशी व शिवसेनाप्रमुखांशी वाईट वागले. महाराष्ट्र सदन उभारण्यात घोटाळा झाला नसल्याचे सत्य तेव्हा फक्त ‘सामना’नेच छापले. आम्ही व्यक्तिगत वैर ठेवत नाही. भुजबळ सुटले. त्यांच्या कुटुंबीयांना नक्कीच आनंद झाला असेल. भुजबळांनी त्यांच्या प्रकृतीकडे जास्त लक्ष द्यायला हवे. ते जामिनावरच सुटले आहेत याचे भान त्यांनी सदैव ठेवायला हवे. सुज्ञांस अधिक काय सांगावे!”, असे सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने म्हटले आहे. त्यामुळे नवीन राजकारण तयार होते की दुसरे अजून काही कारण आहे, हे पुढे समोर येईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात काही भागांमध्ये उष्णतेची लाट आणि रेड अलर्ट, तर इतर भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

शरद पवार यांच्या उपस्थितीत एक मोठा निर्णय; राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) पक्षाने दोन गटांच्या विलीनीकरणाला पूर्णविराम दिला

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पक्षांच्या विलीनीकरणालाही स्पष्टपणे पूर्णविराम

LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी कोचिंग कॅम्पस वर बुलडोझर चालला

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी २०२७ च्या जनगणनेत जात जनगणनेचा समावेश करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला

पुढील लेख
Show comments