Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या भागांना अवकाळी पावसाचा इशारा

Webdunia
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2024 (14:22 IST)
राज्यात पहाटेच्या वेळी गारवा जाणवतो, मात्र दिवसभर तापमानात चांगलीच वाढ होते. तसेच राज्याच्या बहुतेक भागांमधून थंडी गायब होत असून तापमानात वाढ होऊ लागली आहे. राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने काही दिवसांपूर्वीच हजेरी लावली होती. शेतकऱ्यांचं पाऊस आणि गारपीटमूळे मोठे नुकसान झाले. आता पावसाबद्द्ल महत्वाची बातमी समोर आली आहे. 
 
तसेच राज्यामध्ये ढगाळ वातावरण काही ठिकाणी होत असून अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने काही दिवसांमध्ये विदर्भासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात 26 ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान विदर्भाच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली  आहे. तसेच अवकाळी पावसाची शक्यता नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये वर्तवली आहे.
 
तसेच  मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी ढगाळ हवामान राहिल. या कालावधीत मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांच्या आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे.
 
तसेच पुढील 3-4 दिवसांत देशातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उत्तराखंडमध्ये तसेच जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. 
 
उत्तर मध्य प्रदेशातही ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील. तसेच पंजाब, हरियाणा आणि दिल्लीमध्ये पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

बीड जिल्ह्यात 300 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला मथुरेतून अटक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन

मुंबईत घटस्फोट मागणाऱ्या पत्नीच्या चेहऱ्यावर पतीने एसिड ओतले

दुसरीच्या मुलाचा बळी !, शाळेच्या प्रगतीसाठी घाणेरडे कृत्य

पोलीस एन्काउंटर कधी करते,सुप्रीम कोर्टाची मार्गदर्शक तत्त्वे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments