Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उरण : पुरग्रस्तांची मदत करताना पोलीस अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

Webdunia
शनिवार, 22 जुलै 2023 (10:24 IST)
सध्या पावसाने सर्वत्र झोडपले आहे. राज्यातील काही भाग पूरग्रस्त झाले आहे. नवी मुंबई व रायगड या भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहे. रायगड जिल्हयात इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या अपघातात 20 लोकांचा मृत्यू झाला तर अजूनही 86 लोकांचा शोध सुरू आहे. तर 100 पेक्षाही जास्त जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. 5 जखमींवर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
 
उरण मधील चिरनेर भागात सध्या पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. 
या भागात पुरग्रस्तांची मदत करण्यासाठी पोलीस दलाच्या अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. विशाल राजवाडे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. विशाल हे उरणच्या चिरनेर भागात स्वतः पूरग्रस्त लोकांची मदत करण्यासाठी या भागात गेले त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बातमी कळतातच याची दखल घेत त्यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना फोन करून राजवाडे यांच्या कुटुंबाला शक्य तेवढी मदत करण्याचे आदेश दिले. तसेच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला अनुकंपावर घेण्याचा विचार करण्याचे सांगितले. राजवाडे यांच्या निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य

मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य, हरियाणात जे झालं ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला चेतन पाटीलला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघात 26 जण जखमी

हेअर ड्रायर चालू करताच स्फोट, महिलेची बोटे तुटली

पुढील लेख
Show comments