Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विठ्ठल रूक्मिणी मूर्तीवर आजपासून होणार वज्रलेप

विठ्ठल रूक्मिणी मूर्तीवर आजपासून होणार वज्रलेप
पंढरपूर , मंगळवार, 23 जून 2020 (12:30 IST)
श्री विठ्ठल व रूक्मिणी मूर्ती संवर्धनासाठी वज्रलेप करण्याची परवानगी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने शासनाच्या न्याय व विधी खात्याकडे मागितली होती. यास मान्यता देण्यात आली असून ही प्रक्रिया आता 23 व 24 जून रोजी पार पडणार आहे. यासाठी औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी येथे येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
  
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने 16 मार्च रोजी राज्यशासनाच्या न्याय व विधी खात्याकडे दोन्ही मूर्तींना वज्रलेप करण्याची परवानगी मागितली होती. यास 4 जून रोजी मान्यता देण्यात आली आहे. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने या काळातच पुरातत्व विभागाकडून हे वज्रलेपन करून घेण्याचे नियोजन होते. त्याप्रमाणे आता वज्रलेप  केला जात आहे.
  
यापूर्वीही मूर्तीवर 1998, 2005 व 2012 मध्ये वज्रलेप करण्यात आले होते. 2012 मध्ये आठ वर्षापूर्वी शेवटचा वज्रलेप करण्यात झाला होता. दर पाच वर्षानंतर मूर्तींना हा लेप द्यावा,अशी सूचना पुरातत्व विभागाने केली आहे. या विषयी उत्तराखंड येथील डेहराडून भारतीय पुरातत्व विभाग यांच्याकडे याबाबत मंदिर समितीने परवानगी मागितली होती. त्यानुसार मागील काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाच्या अधीक्षकांनी (रसायनतज्ज्ञ) मूर्तीची पाहणी केली होती व वज्रलेप करण्याची शिफारस केली होती. यानंतर मंदिर समितीने शासनाच्या न्याय व विधी खात्याकडे यासाठी परवानगी मागितली होती. आता औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक (रसायनतज्ज्ञ) श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मंदिर समितीचे सहअध्यक्ष, सदस्य  व सल्लागार परिषदेचे सदस्य यांच्या सक्ष 23 व 24 रोजी श्री विठ्ठल व रूक्मिणीच्या मूर्तीस वज्रलेप करण्यात येणार आहे.
  
सध्या विठुरायाचे दर्शन बंद असल्याने दोन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यामुळे  मूर्तीला नवीन झळाळी येणार असून तिचे संवर्धन देखील होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो...