Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तडकाफडकी दिल्लीला; मोठा निर्णय होणार?

Webdunia
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2023 (08:31 IST)
राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता ॲक्शन मोडवर आले आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या कारवाईला आता वेग आला आहे असून कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा करण्यासाठी राहुल नार्वेकर हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
आमदार अपात्रता कारवाईला वेग आल्याने शिंदे गटातील आमदारांचं टेन्शन वाढलं आहे. येत्या एक ते दोन दिवसात राहुल नार्वेकर हे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस देखील बजावणार असल्याचं समजतय.
 
त्याच पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरविल्यास सरकार वाचविण्यासाठी भाजपाने आपला प्लॅन बी तयार ठेवला आहे.
 
भाजपचा आपला प्लॅन बी तयार
एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचा पहिला पर्याय असणार आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. याशिवाय भाजपाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं देखील नाव चर्चेत आहे. शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई झाली तरी, भाजपकडे विधानसभेत 105 आमदार, अपक्ष आणि छोटे पक्ष तसेच अजित पवार यांच्या गटाचे 40 आमदार मिळून मोठे संख्याबळ आहे. त्यामुळे बहुमताची अडचण नाही. त्यामुळे शिंदे गटातील आमदार अपात्र ठरल्यास राज्यात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

अजित पवार म्हणाले मुंडेंना विचारा की ते मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहे का?

अकोला : हातरुण गावात मुले चोरीच्या अफवेवरून गावकऱ्यांनी चार तरुणांना केली मारहाण

LIVE: अकोला जिल्ह्यात गावकऱ्यांनी चार तरुणांना केली बेदम मारहाण

कमी शिजवलेले चिकन खाऊ नका ते धोकादायक आहे, अजित पवारांनी हा इशारा का दिला?

अपार्टमेंटमध्ये आढळले एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह

पुढील लेख
Show comments