rashifal-2026

भाषेच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, कारवाई होणार, मराठी वादावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान

Webdunia
शुक्रवार, 4 जुलै 2025 (17:55 IST)
Maharashtra News: महाराष्ट्रात मराठी भाषेवरून वाद सुरू आहे. 'मराठी बोलल्याबद्दल' एका गुजराती माणसाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याने हा वाद आणखी वाढला आणि व्हिडिओ व्हायरल झाला.
ALSO READ: मनीषा कायंदे यांच्या शहरी नक्षलवाद्यांच्या आरोपावर शरद पवारांनी दिले सडेतोड प्रत्युत्तर
महाराष्ट्रात मराठी भाषेवरून सुरू असलेला वाद आणखी वाढला जेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी एका गुजराती व्यक्तीला मराठी बोलण्यास सांगितले आणि त्याला मारहाण केली. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि भाषेवरून हिंसाचार किंवा गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही असे सांगितले.
<

#WATCH | मुंबई: महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा, "मैं स्पष्ट शब्दों में बताना चाहता हूं महाराष्ट्र में मराठी भाषा पर गर्व करने में कोई गलत बात नहीं है लेकिन भाषा के चलते अगर कोई गुंडागर्दी करेगा तो इसे हम सहन नहीं करेंगे। कोई अगर भाषा के आधार पर मारपीट करेगा तो… pic.twitter.com/AZTaiwWnLC

— ANI_HindiNews (@AHindinews) July 4, 2025 >
भाषा वरून भांडण करणे चुकीचे आहे. मुंबईत मराठीच बोलली पाहिजे. पण जर एखाद्याला मराठी भाषा येत नसेल तर त्यासाठी त्याला मारहाण करणे चुकीचे आहे. हे सहन केले जाणार नाही. आपले मराठी बांधव अनेक ठिकाणी व्यवसाय करतात त्यांना तिथली भाषा येत नसेल तर त्यांना अशी वागणूक मिळवणे योग्य आहे का ?
ALSO READ: महाराष्ट्र सरकारने बृहन्मुंबई महानगरपालिकेला मुंबईत बांधलेले 'कबुतरखाना' तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले
मराठीचा अभिमान बाळगणे काही गैर नाही पण भाषेवरून गुंडगिरी आम्ही सहन करणार नाही. या घटनेसाठी एफआयआर नोंदविण्यात आला आहे. आणि या पुढे भविष्यात आणखी गुन्हे दाखल केले जातील. भारतात कोणत्याही भाषेवरून अशी गुंडगिरी सहन केली जाणार नाही. असे कोणी केले तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. 
 
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मला आश्चर्य वाटते की हे लोक इंग्रजी स्वीकारतात आणि हिंदीवर वाद घालतात, हा काय विचार आहे आणि ही काय कारवाई आहे? कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, जर एखादा मराठी माणूस आसाममध्ये जाऊन व्यवसाय करतो आणि त्याला आसामी भाषा येत नसेल तर त्याला मारहाण करावी का?
ALSO READ: दाढीवाले आणि गोल टोपीवाले लोक मराठी बोलतात का? जर तुमच्यात हिंमत असेल तर...नितेश राणेंचे मनसेला आव्हान
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर तुम्हाला मराठीचा अभिमान असेल तर मराठी शिकवा, वर्ग सुरू करा. जर तुम्हाला मराठीचा अभिमान असेल तर लोकांना मराठी बोलण्यास प्रेरित करा. 
 
आपण लोकांना मराठी बोलण्याचे आवाहन करू शकतो पण त्यांना सक्ती करू शकत नाही. जर मला मराठी बोलायचे असेल तर मी बोलेन, पण जर मला मराठी येत नसेल तर त्यांना मारहाण करणे योग्य आहे का?
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: शिक्षण कर्मचाऱ्यांनी ८ डिसेंबरपासून तीव्र आंदोलनाची घोषणा केली

बीएमसीने मुंबईकरांसाठी ५ ते ७ डिसेंबरपर्यंत भरती-ओहोटीचा इशारा जारी केला

मोहम्मद शमीने निवडकर्त्यांना त्याच्या कामगिरीने चोख प्रत्युत्तर दिले, SMAT २०२५ सामन्यात धुमाकूळ घातला

निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राज्यात खळबळ उडाली; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "सरकारचा कोणताही सहभाग नाही"

पुण्याच्या नवले पूल दुर्घटनेचा मुद्दा सुप्रिया सुळेंनी संसदेत उपस्थित केला, नितीन गडकरींनी दिले उत्तर

पुढील लेख
Show comments