Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चमत्कार नाही तर तंत्रज्ञान, मुंबई - पुणे फक्त ३० मिनिटात

Webdunia
राज्य सरकारने मुंबई-पुणे प्रवास सर्वात कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी एक मोठा महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, हा या वर्षीच्या २०१९च्या  अखेरपर्यंत सुरु होणार आहे. हे मोठे आणि महत्वाचे  काम करणाऱ्या व्हर्जिन हायपरलूप वन (Virgin Hyperloop One) अमेरिकन कंपनीचे भारताचे व्यवस्थापकीय संचालक धालिवाल कन्स्ट्रक्शन वीकला याविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे हा चमत्कारच ठरणार आहे. 
 
मुंबई ते पुणे हायपरलूप मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर साडेतीन तासांचा मुंबई-पुणे प्रवास फक्त आणि फक्त  25 मिनिटात पूर्ण  करता येणार आहे. अर्थात  मुंबईवरुन पुण्याला किंवा पुण्यावरुन मुंबईला जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे तब्बल 3 तास पूर्ण वाचणार आहेत.  पुणे व मुंबईमधील अंतर हे जवळपास 150 किलोमीटर असून,  या प्रस्तावित प्रकल्पाचा फायदा जवळपास 2 कोटी 60 लाख नागरिकांना होईल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.सोबतच मुंबई-पुणे हायपरलूप मार्गामुळे पुणे आणि नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळही जोडले जाणार असून, पहिल्या टप्प्यात केवळ 11.8 किलोमीटरचा ‘डेमॉन्स्ट्रेशन ट्रॅक’ उभारला जाणार आहे. त्यामुळे आता स्वप्नवत वाटणारे आता प्रत्यक्षात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ठरणार असून त्यामुळे राज्य एका वेगळ्या प्रगतीच्या वाटेवर जाणार आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून ते स्वतः यामध्ये लक्ष देत आहेत.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments