Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकमध्ये “या” दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार

Webdunia
Nashik News मनपाच्या मुकणे धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथून ३३ के. की वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे.
 
या सबस्टेशन मधील विद्युत विषयक कामे करण्याकरीता विज वितरण कंपनीमार्फत शनिवार दि. २० मे रोजी वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मनपाचे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार नाही.
 
तसेच मनपाचे गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथून मनपाचे शिवाजीनगर, बाराबंगला, पंचवटी, निलगीरीबाग, गांधीनगर, नाशिक रोड या जलशुध्दीकरण केंद्रास पाणीपुरवठा करण्यात येतो, हे जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभ व वितरण व्यवस्थेतील आवश्यक दुरुस्तीची कामे करणे गरजेचे असल्याने गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.
 
सबब सदर दोन्हीही ठिकाणाहून होणारा पाणीपुरवठा दि. २० मे रोजी बंद ठेवून अनु. क्र. १ व २ मधील नमुद दुरुस्ती कामे करता येणे शक्य होणार आहे. तरी मनपाचे मनपाचे गंगापुर धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन व मुकणे धरण पंपींग स्टेशन येथून संपूर्ण शहरास होणारा शनिवार दि. २० मे रोजीचा पाणीपुरवठा होणार नाही.
 
तसेच रविवार दि.२१ मे रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) यांनी केले आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

भारतात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगणा तालुक्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात ४ वर्षांच्या मुलीची मृत्यू

LIVE: शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले राज्यात सीबीएसई पॅटर्न २ टप्प्यात लागू करणार

पालघर मध्ये तरुणाने विषारी कार्बन मोनोऑक्साइड वायू श्वासाने घेऊन केली आत्महत्या

औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय स्मारक... वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

पुढील लेख
Show comments