Festival Posters

वाचा, मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज ठाकरे काय करतात ?

Webdunia
मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात यावे यासाठी कटाक्षाने लक्ष देणारे नेता म्हणून राज ठाकरे कसे आहेत यासंदर्भात नुकतीच सरदेसाई यांनी एक पोस्ट केली होती. ही पोस्ट मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आली आहे.
 
मराठी उद्योजकांना पाठिंबा देण्याचा राज यांचा स्वभाव असल्याचे सरदेसाई यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. “‘प्रकाश’ हे दादरच्या मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीतील एक मानाचं पान… लॉकडाऊन दरम्यान मागील ७० दिवस बंद असलेलं हे उपाहारगृह फक्त पार्सल करीता सुरु झालं आणि पहिल्याच दिवशी या उपाहारगृहातून माझ्या घरी पार्सल आलं. आश्चर्य वाटलं… नंतर कळलं की राजसाहेबांनी माझ्यासह त्यांच्या अनेक मित्र व स्नेही यांच्याकडे अशीच पार्सलं पाठवली,” असं सरदेसाई यांनी सांगितलं आहे.
 
परदेशामध्ये गेल्यावरही मराठी उद्योजकांकडून खरेदी करण्याला राज यांचे प्राधान्य असतं असं सरदेसाई सांगतात. “प्रकाशमधून खाणं पार्सल पाठवणं हे तर एक उदाहरण झालं, पण अशाच अनेक गोष्टींचा मी साक्षीदार आहे. धारगळकर यांची माहीमची ‘प्रसाद बेकरी’ असो, चितळे बंधू असो की रत्नागिरीतले भिडेंचं ‘योजक’ असो. मराठी उद्योजकांकडूनच खरेदी करण्याचा त्यांचा कटाक्ष असतो. बरं, खरेदी ही एवढी की एखादी गाडी फक्त सामानानेच भरून जावी! परदेशात गेल्यावर सुद्धा जर तिथे एखाद्या मराठी माणसाचे दुकान अथवा व्यवसाय असल्यास ते हटकून त्याच्याकडेच खरेदी करतात,” असं सरदेसाई यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 
राज हे जगभरातील मराठी व्यवसायिकांच्या पाठिशी ठामपणे उभे असतात असं सांगताना सरदेसाई यांनी एक किस्सा या पोस्टमध्ये सांगितला आहे. “काही वर्षांपूर्वी आम्ही लंडनमध्ये असताना तिथे वडापावचे हॉटेल सुरु करत असल्याचे काही मराठी तरुणांनी भेटून सांगितले. राजसाहेबांनी आत्मीयतेने त्यांच्याकडून सगळी माहिती आणि त्यांच्या भविष्यातील योजना ऐकून घेतल्या आणि मुंबईत आल्यावर भेटायचे आमंत्रण सुद्धा दिले. एवढेच नव्हे तर जितके दिवस आम्ही लंडनमध्ये होतो तितके दिवस, भेटणाऱ्या प्रत्येकाला आणि नंतरही मुंबईतून लंडनला जाणाऱ्या प्रत्येक मित्राला तिथे जाऊन वडापाव खाण्याचा आदेश वजा आग्रह ते करत होते,” असं सरदेसाई यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 
सरदेसाई यांच्या या पोस्टचा स्क्रीनशॉर्ट मनसेच्या अधिकृत अकाउंटवरुन ट्विट करण्यात आला आहे. ‘मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात यावा; ह्यासाठी कटाक्ष असणारा नेता म्हणजे राज ठाकरे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितला अनुभव,’ अशी कॅप्शन देत हा स्क्रीनशॉर्ट शेअर करण्यात आला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

जनगणनाच्या ३३ प्रश्नांमधून ओबीसी रकाना वगळल्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दिल्लीत आंदोलनाचा इशारा

Maruti Suzuki Cars Price Hike: कार खरेदी करायचीये? मग १ जूनआधीच घ्या निर्णय; ३० हजारांनी वाढणार किमती!

महाराष्ट्रातील गोतस्करांची आता खैर नाही; MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार

LIVE: भाजप आमदार प्रसाद लाड यांची जरांगे यांच्याशी भेट

भाजप आमदार प्रसाद लाड यांची जरांगे यांच्याशी भेट, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष आवाहन

पुढील लेख
Show comments