rashifal-2026

शिवसेनेवर कुणाचा हक्क ? आमदारांना नोटीस बजावली, 7 दिवसांत उत्तर देण्याचे आदेश

Webdunia
रविवार, 10 जुलै 2022 (12:17 IST)
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. शिंदे सरकार बहुमत देत असता ठाकरे आणि शिंदे यांच्या प्रतोद कडून एकमेकांना व्हीप बजावला असता हा व्हिप दोन्ही बाजूंकडून पाळला गेला नाही. त्याच अनुषंगाने शिवसेनेनं शिंदे गटाच्या 16 बंडखोर आमदारांना निलंबित करण्यासाठी नोटिसाही पाठवल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेकडून त्यांना अपात्रतेसाठी विधानसभा अध्यक्षांना पत्रही देण्यात आलं होतं.  गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणी मध्ये आम्हीच जिंकणार असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच आम्ही जिंकणार असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे. या दोन्ही गटाच्या आमदारांना विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी नोटीस बजावली असून दोन्ही गटांच्या आमदारांना येत्या 7 दिवसांत त्याचे उत्तर देण्याचे आदेश दिले आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून आम्ही कुठेही चुकलो नाही, आम्हीच शिवसेनेचे आहोत आणि शिवसेना आमचीच असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विश्वास दाखवला आहे. 
 
 दोन्ही बाजूंकडून व्हिप बजावण्यात आल्यानंतर शिवसेना कोणाची हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर विधिमंडळ सचिवांनी दोन्ही गटांना नोटिसा पाठवल्या असून, आमदारांना 17 जुलैपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

कमला पसंद, राजश्री पान मसालाच्या मालकाच्या सुनेनं केली आत्महत्या, कारण काय?

शिवसेनेला मतदान म्हणजे विकास; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गोंदियातील मतदारांना विशेष आवाहन

मुंबई विमानतळावर ३२ कोटी रुपयांचे हायड्रोपोनिक गांजा जप्त, ८ प्रवाशांना अटक

हवामान पुन्हा बिघडणार, चक्रीवादळाचा या राज्यांवर होणार परिणाम; आयएमडीने अलर्ट जारी केला

टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये का? आदित्य ठाकरे आयसीसीच्या वेळापत्रकावर बोलले

पुढील लेख
Show comments