Marathi Biodata Maker

२०१९ ची चूक सुधरायला अडीच वर्ष का लागली?नाना पाटेकपाटेकरांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न

Webdunia
बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (08:46 IST)
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांनी घेतलेली महामुलाखत ही खास आकर्षण ठरली. या मुलाखतीदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०१९ मध्ये जे व्हायला पाहिजे होतं, ते आम्ही तीन महिन्यांपूर्वी केलं, असं म्हटल्यावर २०१९ ची चूक सुधरायला अडीच वर्ष का लागली? असा प्रश्न नाना पाटेकर यांनी विचारला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ काळ जुळून यावी लागते, असं उत्तर दिलं.
 
या मुलाखतील एकनाथ शिंदे म्हणाले की, नानांनी व्यक्त केलेल्या भावना योग्य आहेत. तीन महिन्यांपूर्वी आम्ही जे काही केलं ते तुमचा आदर आणि मतदारांचा आदर केला आहे. तो २०१९ ला व्हायला हवा होता. तेव्हा आम्ही शिवसेना भाजपा युती म्हणून लढलो होतो. आम्हाला बहुमत मिळालं होतं. भाजपाचे १०० हून अधिक आणि शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले होते. सगळ्या मतदारांना वाटलं होतं की बहुमताप्रमाणे सरकार स्थापन होईल. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. पण आम्ही तीन महिन्यांपूर्वी ते केलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावर नाना पाटेकर यांनी हे करायला अडीच वर्ष का लागली असा प्रश्न विचारला.
 
या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, कारण या सगळ्या गोष्टी घडवून यायला योग्य योग वेळ यावी लागते. मधल्या काळात कोविड होता. त्या काळात असं काही केलं असतं तर कोविड असताना असं का करताहेत असा प्रश्न विचारला गेला असता. त्या काळात आम्ही प्रयत्न करत होतो. अखेर तीन महिन्यांपूर्वी आम्ही तुमच्या मताचा आदर केला, असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.
 
Edited By - Ratandeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

टेनिस जगातील अल्काराज-फेरेरो जोडी विभक्त झाली, सात वर्षांची भागीदारी संपुष्टात आली

खालिदा झिया यांची प्रकृती चिंताजनक, डॉक्टरांनी दिले अपडेट

इशान किशनच्या नेतृत्वाखाली इतिहास रचत झारखंड संघ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा नवा विजेता बनला

LIVE: दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेत मोठा बदल

रत्नागिरी जिल्ह्यात बसने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुढील लेख
Show comments