rashifal-2026

उद्धव ठाकरेंनी आनंद आश्रम या ठिकाणी जाणं का टाळलं

Webdunia
शुक्रवार, 27 जानेवारी 2023 (08:02 IST)
उद्धव ठाकरे हे ठाण्यामध्ये गेले होते. ठाण्यातल्या आरोग्य शिबीरात त्यांची उपस्थिती होती. त्यावेळी त्यांनी एक छोटेखानी भाषणही केलं. माझ्यासोबत जे राहिले आहेत ते अस्सल कडवट शिवसैनिक बाकी विकाऊ विकले गेले असं म्हणत त्यांनी ठाण्यात जाऊन एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहारही अर्पण केला. मात्र आनंद आश्रम या ठिकाणी जायचं त्यांनी टाळलं. उद्धव ठाकरेंनी असं का केलं? याचं कारण समोर आलं आहे.

उद्धव ठाकरेंनी आनंद आश्रम या ठिकाणी जाणं का टाळलं?
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभी नाका या ठिकाणी आनंद आश्रम आहे. आज उद्धव ठाकरे ठाण्यात येणार होते त्याआधी आज सकाळी या आनंद आश्रमावर बाळासाहेबांची शिवसेना हा फलक उभारण्यात आला. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आनंद आश्रम या ठिकाणी जाणं टाळलं असल्याचं बोललं जातं आहे. हा फलक लागला तेव्हापासूनच आता उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार नाहीत अशी चर्चा सुरू झाली होती. घडलंही तसंच.
ठाण्यातल्या टेंभीनाका भागात असलेल्या आनंद आश्रमात दिवंगत आनंद दिघे वास्तव्यास होते. याच आश्रमातून आनंद दिघे पक्षाचा कारभार करत असत. आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर शिवसैनिक या आश्रमात येऊ लागले.

Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र सरकारने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पुणे आणि बीडच्या पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली

नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम 15 महिन्यांत पूर्ण होईल

जुन्नर मध्ये दुचाकीची धडक होऊन अपघातात तरुणाचा मृत्यू

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार देण्याची घोषणा

15 फेब्रुवारीनंतर नवीन खरेदीवर बंदी, राज्य सरकारच्या निर्णय

पुढील लेख
Show comments