Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनैतिक संबंधाच्या रागातून पत्नीच्या प्रियकरावर चाकूने वार…

Webdunia
मंगळवार, 5 जुलै 2022 (07:45 IST)
पत्नीच्या प्रियकराला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे.
रविवारी रात्री हा प्रकार घडला.पोलिसांनी सदर पत्नी, पती व पतीचा साथीदार यांना ताब्यात घेतले आहे.पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून पतीने पत्नीच्या प्रियकराच्या गळ्यावर वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, टाकळीरोडवरील नारायणाबापूनगर परिसरात राहणार्‍या एका 30 वर्षीय इसमाचे एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. ही बाब तिच्या पतीला समजल्याने त्याने  ३ जुलै रात्री आठ वाजेच्या सुमारास या प्रियकराच्या गळ्यावर वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. घटना घडल्यानंतर तो तेथून पसार झाला. स्थानिक नागरिकांनी त्या जखमी इसमास प्रथम सिव्हील हॉस्पिटल व त्यानंतर पुढील उपचाराकरता डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे दाखल केले.
घटनास्थळी पोलिसांना आरजे 09एसएक्स 3992 या क्रमांकाची मोटारसायकल मिळून आली. त्यावरून माहिती घेतली असता जखमी इसमाचे शेजारी राहणार्‍या महिलेशी असलेल्या प्रेम संबंधांतून तिच्या नवर्‍याने आपल्या साथीदारासह आगळ टाकळी गाव येथील उसाच्या शेताजवळ त्याच्या गळ्यावर सुरा मारून त्यास गंभीर जखमी केल्याचे निष्पन्न झाले.
 
पोलिसांनी त्वरीत संशयित आरोपीचा शोध घेत त्याला त्याच्या साथीदार व पत्नीसह ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी जखमी इसमाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम उपनगर पोलीस ठाण्यात सुरू आहे. पोलिसांनी या जखमी इसमास खासगी रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

पुढील लेख
Show comments