Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 5 April 2025
webdunia

पोलीसांवर आरोप करत महिला चढली होर्डिंगवर

maharashtra news
मुंबईतील चर्नी रोड रेल्वे स्थानका बाहेरील होर्डिंगवर एक महिला चढली. पोलीस चोर आहेत, असा आरोप ती करत होती. अखेर पोलिसांनी मोठ्या मुश्किलीने अग्निशमन दलाच्या मदतीने तिला सुखरुप खाली उतरवलं. 

शोले चित्रपटातील वीरू स्टाईल मागणी करणारी ही महिला खाली उतरण्यास बिलकूल तयार नव्हती. मला न्याय हवा आहे, असंच ती सतत म्हणत होती. तिला पाहाण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी जमली. लोक तिला खाली येण्याचा आग्रह करू लागले. मात्र ती तयार झाली नाही. उलट या महिलेनं आत्महत्येची धमकी दिली. त्यानंतर पीएसआय संतोष राठोड यांनी महिलेला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. तर तिनं त्यांना लाथा मारण्यास सुरुवात केली. अखेर अग्निशमन दलाच्या मदतीनं या महिलेला खाली उतरवण्यात आलं.

मात्र ती होर्डिंगवर का चढली, तिला कोणाकडून न्याय हवा होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आनंद महिंद्रा यांनी केला मजेशीर फोटो ट्विट