Dharma Sangrah

संजय राऊत यांना वाय दर्जाची सुरक्षा

Webdunia
गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (16:05 IST)
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊतांच्या जीवाला संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांच्याभोवती आता 11 जवानांचं कडं असेल. संजय राऊत यांना आता वाय (Y) दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. ‘वाय’ प्रकारात 1 किंवा 2 कमांडो आणि पोलिस कर्मचार्‍यांसह 11 जवानांचे सुरक्षा कवच असते. दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांचाही (पीएसओ) यामध्ये समावेश होतो. अशा प्रकारची सुरक्षा भारतात बऱ्याच व्यक्तींना आहे.
 
मोदी सरकारने कलम 370 हटवल्यानंतर संजय राऊत यांनी राज्यसभेत जोरदार भाषण करत खंबीर पाठिंबा दिला होता. “कलम 370 हटवणे म्हणजे एका भस्मासुराचा वध करण्यासारखे आहे. एका सैतानाला मारण्यासारखे आहे. या कलमामुळे आपण 70 वर्षांपासून हा देश, संविधानावर एक डाग घेऊन चालत होतो. तो डाग आज धुवून टाकला गेला, असं जोरदार भाषण करत संजय राऊत यांनी अमित शाहांना पाठिंबा दिला. संजय राऊत यांच्या भाषणादरम्यान अमित शाहांनी त्यांना पाठिंबा देत अभिमानाने बाकही वाजवला होता. सोबतच कलम 370 हटवल्यानंतर संजय राऊतांनी राज्यसभेत केलेल्या भाषणानंतर त्यांचे पाकिस्तानात पोस्टर लागले होते.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

बारामती निवडणुकांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, "अजितसोबत जे घडले त्यानंतर कुटुंबाने निवडणूक लढवायला नको होती.

नेपाळच्या चार जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूने हाहाकार माजवला

नागपुरात बेपत्ता पतीचा शोध महागात पडला, महिलेवर भोंदू बाबाने बलात्कार केला, आरोपीला अटक

LIVE: शरद पवार म्हणाले अजितसोबत जे घडले त्यानंतर कुटुंबाने निवडणूक लढवायला नको

अकोला येथे दोन गटांमध्ये भीषण संघर्ष, अनेक जण जखमी

पुढील लेख
Show comments