Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पबजी खेळताना तरुणाचा मेहूण्यावरच चाकू हल्ला

Webdunia
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019 (17:29 IST)
मुंबईतल्या कल्याण पूर्वमध्ये पहाटेच्या सुमारास पबजी गेम खेळत असताना, मोबाईलची बॅटरी उतरल्यामुळे संतापलेल्या तरुणाने होणाऱ्या मेहूण्यावरच चाकू हल्ला केला. या हल्ल्यात पीडीत गंभीर जखमी झाला आहे. 
 
या घटनेत ओम बावदनकर हा अंबरनाथ येथील रहिवासी आहे. ओम याचे कल्याण पूर्व काटेमानवली पावशे नगर जयमोती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत लग्न जमले होते. नेहमी प्रमाणे ओम हा त्याच्या होण्याऱ्या पत्नीच्या घरी गेला होता. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ओमच्या होणाऱ्या पत्नीचा भाऊ रजनीश हा मोबाइलवर पबजी गेम खेळत होता. गेम खेळत असताना त्याच्या मोबाईची बॅटरी कमी झाल्यामुळे तो चार्जर शोधू लागला. जर मोबाईल चार्जिंगला नाही लावला, तर त्याला गेम अर्धवट सोडून द्यावा लागेल. या उद्देशाने रजनिश मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी धडपड करु लागला. परंतु चार्जर कुत्राने चावल्यामुळे फोनला चार्जिंग होत नव्हती. त्यामुळे रजनिश अधिकच संतापला आणि घरात वाद घालू लागला. रागाच्या भरात रजनिशने त्याच्या बहीणीच्या लॅपटॉपचे चार्जर चाकूने कापून टाकले. यामुळे ओमही रजनिशला रागात ओरडला आणि हे कृत्य थांबवण्यास सांगितले. आधिच गेम अर्धवट सोडावा लागल्यामुळे रजनिशचा पारा चढला आणि त्याने हातात असलेल्या चाकूनेच ओमवर हल्ला केला.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments