Festival Posters

Birthday Wishes In Marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Webdunia
Birthday Wishes In Marathi 

आनंदी क्षणांनी भरावे 
असे तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 
जुळले तुझे मन माझ्याशी,
जुळली आपली नाती एकमेकांशी
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 
वाढदिवस म्हणजे एक नवी सुरुवात
वाढदिवस म्हणजे नवीन ध्येयांसह नवीन प्रयत्नांचा पाठपुरावा करण्याची वेळ
वाढदिवस म्हणजे आत्मविश्वास आणि धैर्याने पुढे जाण्याची संधी 
अशात एका खास व्यक्तीस 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुमचा वाढदिवस माझ्यासाठी खूप खास आहे
कारण तो आम्हाला आठवण करून देतो की
या दिवशी तुम्ही माझ्या आयुष्यात 
नवीन आशा आणि आनंद घेऊन आला आहात.
तुमचा वाढदिवस सुंदर जावो 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
या विशेष दिवशी
माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
मला आशा आहे की हा अद्भुत दिवस 
तुमचे हृदय आनंदाने, आशीर्वादाने आणि अत्यंत आनंदाने भरून जाईल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
जीवेत शरद: शतं
पश्येत शरद: शतं
भद्रेत शरद: शतं
अभिष्टचिंतनम
जन्मादिवसस्य शुभाशय:
 
सूर्यासारखा तेजस्वी हो
चंद्रासारखा शीतल हो
फुलासारखा मोहक हो
कुबेरासारखा धनवान हो
माता सरस्वती सारखा विद्वान हो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 
नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू
माझ्या शुभेच्छांच्या
पावसात भिजावे 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
जगातील सर्व चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू द्या  
कारण तुम्ही सर्वोत्तम लोकांपैकी एक आहात 
माझ्या सर्वात जवळच्या व्यक्तीस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
 
आज आणि नेहमी तुम्हाला शांती, प्रेम 
आणि उत्तम आरोग्याच्या खूप शुभेच्छा
तुमचा वाढदिवस आल्हादायक जावो
 
जो कायमचा तरुण आहे 
अशा हसमुख व्यक्तीला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
 
या विशेष दिवशी 
तुमची सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 
व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
वाढदिवस आनंदाचा
क्षण असे हा सौख्याचा 
सुख शांती जीवनात नांदो 
वर्षाव पडो शुभेच्छांचा
 
नवे क्षितिज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

अग्निसार प्राणायाम केल्याने बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणासह सर्व आजार बरे होतील

प्रेरणादायी कथा : राजाचा प्रश्न

सणासुदीला दिसा खास; ५ सोप्या स्टेप्समध्ये शिका घरच्या घरी मेकअप!

Suicide due to periods pain समाजासाठी गंभीर धोक्याची घंटा

भारतीय समाजात घटस्फोटाचे प्रमाण का वाढते आहे? नाते वाचवण्यासाठी काही सोपे प्रयत्न

पुढील लेख
Show comments