Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Karwa Chauth 2023: पत्नीला भेट म्हणून करवा चौथला हे गिफ्ट्स द्या, नक्की आवडणार

Webdunia
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023 (15:28 IST)
Karwachauth Gift Ideas:  यावर्षी करवा चौथ हा सण 1 नोव्हेंबर 2023 रोजी आहे. करवा चौथ हा विवाहित जोडप्यासाठी सर्वात महत्वाचा हिंदू सण आहे. या सणात स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. विवाहित स्त्रिया संध्याकाळी पूजा करतात जेव्हा चंद्र उगवतो,तेव्हा चांद्रमाला पाहून त्या उपवास सोडतात आणि पाणी पितात. ज्या मुलींचे लग्न होणार आहे ते देखील त्यांच्या होणाऱ्या जोडीदारासाठी लग्नापूर्वी करवा चौथचे व्रत करतात.

करवा चौथला तो आपल्या पत्नीला भेटवस्तू देतो. पती किंवा मंगेतराकडून मिळालेले गिफ्ट पाहून महिला आनंदी होतात. या करवा चौथला पत्नी ला या काही गिफ्ट्स पैकी गिफ्ट्स देऊ शकता. ते पाहून त्यांना नक्कीच आनंद होणार. हे तुमच्या बजेट मध्ये देखील बसेल.चला तर मग जाणून घेऊ या.  
 
पारंपारिक साडी:
करवा चौथच्या निमित्ताने स्त्रिया सुहागची साडी किंवा नवीन पारंपारिक कपडे घालून पतीची पूजा करतात. करवा चौथच्या निमित्ताने तुम्ही त्यांना ट्रेंडी पण पारंपारिक साडी भेट देऊ शकता. सध्या हॅन्डलूमच्या साड्यांना मागण्या आहेत. बनारसी किंवा सिल्कच्या साड्या हा नेहमीच ट्रेंडमध्ये असतो. तुम्ही तुमच्या पत्नीला हॅन्डलूमची सुंदर साडी भेट देऊ शकता. जरी त्यांची किंमत जास्त आहे, परंतु ते ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर किंवा काही मार्केटमध्ये बजेटमध्ये देखील खरेदी केले जाऊ शकतात.
 
ब्रेसलेट किंवा कस्टमाइज्ड पेंडेंट -
आजकाल, विशेष तारीख किंवा नाव असलेले कस्टमाइज्ड दागिने ट्रेंडमध्ये आहेत. करवा चौथला तुम्ही तुमच्या पत्नीला या प्रकारचे कस्टमाइज्ड दागिने देखील भेट देऊ शकता. करवा चौथच्या दिवशी तुम्ही तुमच्या पत्नीला खास अक्षराने डिझाइन केलेले पेंडेंट किंवा तिच्या नावाचे ब्रेसलेट दिले तर तिला तुमची भेट नक्कीच आवडेल.
 
आठवणींचा अल्बम:
स्त्रिया त्यांच्या आयुष्याच्या जोडीदाराने त्यांच्यावर प्रेम करावे आणि त्यांच्या भावना उघडपणे व्यक्त करावी अशी अपेक्षा करतात. तुमच्या पत्नीची ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करा आणि तुमच्या वागण्यातून तुमच्या भावना व्यक्त करा. हे करण्याचा एक मार्ग म्हणजे जुन्या दिवसांकडे परत जाणे. तुमच्या पत्नीला एक फोटो अल्बम किंवा फोटो फ्रेम भेट द्या, ज्यामध्ये तुमच्या आणि तिच्या आठवणी ताज्या करणारे फोटो असावे. तुमच्या पत्नीला पुन्हा एकदा त्या आठवणींमध्ये घेऊन जा.
 
हँडबॅग:
बहुतेक महिलांना पर्स, हँडबॅग किंवा पाकीट आवडतात. पर्समध्ये अनेक प्रकार आहेत. गरजेनुसार तुम्ही तुमच्या पत्नीला हँडबॅग किंवा क्लच भेट देऊ शकता. त्यांना तुमची भेट आवडेल. ती पर्स हातात घेऊन बाहेर जाऊ शकते. 







Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

सर्वांना आवडेल अशी झटपट मुगाच्या डाळीची चकली

Conceive Quickly गर्भधारणा करायची असेल तर संबंध ठेवल्यानंतर किती पडून राहणे आवश्यक जाणून घ्या

Winter Special Recipe: गाजर हलवा

व्यावसायिक पायलट होण्यासाठी प्रक्रिया जाणून घ्या

या फळात आहे पुरुषांच्या 5 समस्यांवर उपाय, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments