Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Parents Bad Habits Impact on Kids : पालकांच्या या सवयीं मुलांवर वाईट परिणाम करतात जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (15:00 IST)
असं म्हणतात की मुलं प्रत्येक पालकासाठी त्यांचे आयुष्य असतात.माणूस म्हणून आई-वडिलांना कितीही वाईट सवयी किंवा वाईट वागणूक असेल, पण मूल आयुष्यात आल्यावर त्या बदलायलाच हव्यात कारण तुमच्या व्यक्तिमत्त्वावर मुलाचा परिणाम होतो.अशा वेळी तुमच्या सवयी चांगल्या नसतील तर कुठेतरी त्याचा परिणाम मुलांवर वरही होतो.अशा परिस्थितीत काही सवयी बदलणे खूप गरजेचे आहे.त्यामुळे सहसा पालकांमध्ये काही सवयी असतात, ज्यांचा मुलांवर वाईट परिणाम होतो.चला तर मग जाणून घ्या.
 
1 एकमेकांवर ओरडणे-
 पती-पत्नी एकमेकांवर ओरडले तर त्याचा परिणाम मुलांवर होतो.मूलही ओरडून  बोलायला लागतात.त्यांच्या वागण्यात उद्धटपणा आणि राग दिसतो.तो इतर मुलांना दाबण्याचा प्रयत्न करतो. 
 
2 अल्कोहोल किंवा इतर मादक द्रव्य घेणे-
 ज्या मुलांनी त्यांच्या पालकांना नेहमी मद्यपान करताना पाहिले आहेत त्या मुलावर कसा परिणाम होईल ? पालकांनी असे वागल्याने मुलांनाही अशी वाईट सवय लागू शकते. याशिवाय मद्यपान प्यायल्याने काय होते हे जाणून घेण्याची उत्सुकता ही वाढते. 
 
3 निंदा नालस्ती करणे -
काही मुलांचे लक्ष मुलांशी खेळण्यापेक्षा मोठ्यांच्या गोष्टींकडे जास्त असते.याचं कारण म्हणजे ते मोठ्यांच्या गोष्टींकडे लक्ष देतात आणि मग त्यांना इतरांची निंदा करण्याची सवय ही लागते. 
 
4 भेदभावपूर्ण व्यवहार करणे  -
मुले देखील त्यांच्या मोठ्यांकडून जात, लिंग, भाषा, प्रदेश इत्यादींबद्दल भेदभावपूर्ण गोष्टी शिकतात.उदाहरणार्थ, जर मुलाचे वडील आपल्या आईला कमी दर्जाचे समजत असतील किंवा नेहमी वाईट बोलत असतील, तर मूल देखील तेच शिकतात. 
 
5 प्रत्येकाला वाईट वागणूक देणे - 
मुले त्यांच्या पालकांचे अनुसरण करतात.अशा परिस्थितीत जर तुम्ही प्रत्येकाशी वाईट वागलात, तर मूल ही अशा वागणूकीला योग्य मानून सगळ्यांशी असा व्यवहार करतात.अशा परिस्थितीत पालकांनी त्यांची  वागणूक सुधारणे खूप गरजेचे आहे.  
 
 
Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

त्वचेची घट्ट छिद्रे उघडण्यासाठी हे सोपे घरगुती उपाय वापरून पहा

प्रथिनांच्या कमतरतेवर मात कशी करावी

पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहे धनुरासन! 7 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : उंटाची मान

नवज्योत सिंग सिद्धूच्या पत्नीने कॅन्सरवर केली मात? आयुर्वेदाच्या मदतीने स्टेज 4 चा पराभव

पुढील लेख