Dharma Sangrah

Relationship Advice Tips :नात्यातून ब्रेक घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात घ्या

Webdunia
मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (22:23 IST)
Relationship Advice Tips: नात्यात चढ-उतार येत असतात, ज्यांना एकत्र सामोरं जाता येतं. पण प्रत्येक नात्यात एक वेळ अशी येते, जेव्हा लोकांना ना या चढ-उतारांना सामोरे जायचे असते, ना प्रेमाबद्दल बोलायचे असते. प्रत्येकाला नातेसंबंधातील सर्व त्रासांपासून ब्रेक घ्यायचा आहे आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करायचे आहे. आयुष्याचा आणि नात्याचा हा असा टप्पा आहे, जो लोकांना इच्छा नसतानाही पार करावा लागतो.अशा परिस्थितीत जोडप्याने काय निर्णय घ्यावा हे कळतच नाही. काही जण अशा नात्यातून ब्रेक घेण्यास सांगतात. रिलेशनशिपमधून ब्रेक घेण्याचे ठरवले असेल, तर ते अंमलात आणण्यापूर्वी, काही नियम जोडीदाराशी चर्चा करणे आवश्यक आहे.  नात्यातून ब्रेक घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्यावा
 
ब्रेक घेणे हा खरोखरच चांगला पर्याय आहे का?
रिलेशनशिपमधून ब्रेक घेण्यापूर्वी, तो खरोखरच रिलेशनशिपसाठी चांगला पर्याय आहे की नाही हे स्वतःला विचारा. जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर प्रामाणिकपणे सापडला तर तुमचे नाते सुधारण्यास मदत होईल.तुम्हाला असे वाटत आहे की, ब्रेक न घेतल्यावर सर्वकाही सुरळीत होईल.  तर नात्याला टिकवून ठेऊ शकता.
 
मर्यादा ठेवा- 
रिलेशनशिपमधून ब्रेक घेणे म्हणजे तुम्ही तुमच्या पार्टनरपासून दूर व्हाल आणि तो तुमच्यापासून दूर जाईल. यामुळे तुम्ही आणि तो कधीही परवानगीशिवाय एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाही. ब्रेक घेण्यापूर्वी एकमेकांना मर्यादांची जाणीव करून द्या. 
 
ब्रेक घेण्याचा निर्णय खाजगी ठेवा
सहसा लोक त्यांच्या नातेसंबंधाशी संबंधित गोष्टी कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत शेअर करतात. पण जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमधून ब्रेक घेत असाल तेव्हा तुम्ही तुमचा निर्णय खाजगी ठेवू शकता. रिलेशनशिपमध्ये राहण्याचा किंवा ब्रेकच्या वेळी जोडीदाराला सोडण्याचा जो काही अंतिम निर्णय घ्याल, तो आज तुमच्या जवळच्या लोकांना सांगा. नात्याशी निगडित सर्व गोष्टी प्रत्येकाशी शेअर करणे चांगले नाही.
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

सावधान! कलिंगड खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'हे' ५ पदार्थ; होऊ शकते विषबाधा

स्त्रिया या ५ गोष्टी कधीच सांगत नाहीत… पुरुषांनी नक्की जाणून घ्याव्यात

Gulkand Kulfi recipe बाजारासारखी मलाईदार आणि सुगंधी गुलकंद कुल्फी आता घरीच बनवा

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी 5 सोपे उपाय

Success in Exams परीक्षेत चांगले यश मिळवायचे असल्यास हे ५ खास उपाय करून पहा

पुढील लेख
Show comments