Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Bhavpurna Shradhanjali Messages भावपूर्ण श्रद्धांजली संदेश

Shradhanjali message in Marathi death condolence messages
, बुधवार, 28 जानेवारी 2026 (12:12 IST)
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो... 
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली! 
 
मृत्यू अटळ आहे, तो रोखता येत नाही... 
पण तुमच्या आठवणी आम्ही कधीच पुसू शकत नाही
भावपूर्ण श्रद्धांजली!
 
कष्टातून संसार फुलविला, उरली नाही साथ आम्हाला...
आठवण येते क्षणा-क्षणाला, 
आजही तुमची वाट पाहतो, 
यावे पुन्हा जन्माला...
भावपूर्ण श्रद्धांजली!
 
सहवास जरी सुटला, स्मृती सुगंध देत राहील...
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील
भावपूर्ण श्रद्धांजली!
 
काळाचा महिमा काळच जाणे, 
कठीण तुझे अचानक जाणे...
आजही घुमतो स्वर तुझा कानी, 
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी
भावपूर्ण श्रद्धांजली!
 
तू सोबत नसलास तरी तुझ्या आठवणी सोबत राहतील...
हृदयात तुझी जागा कायमची आहे
भावपूर्ण श्रद्धांजली!
 
ज्योत अनंतात विलीन झाली, 
स्मृती आठवणींना दाटून आली...
भावी सुमनांची ओंजळ भरुनी वाहतो आम्ही
भावपूर्ण श्रद्धांजली! 
 
तुमची आठवण सदैव आमच्या हृदयात राहील,
तुमचे स्थान कधीच भरून येणार नाही
भावपूर्ण श्रद्धांजली!
 
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि 
कुटुंबाला या दुःखातून सावरायची शक्ती देवो
भावपूर्ण श्रद्धांजली!
 
असा जन्म लाभावा, देहाचा चंदन व्हावा...
गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा
भावपूर्ण श्रद्धांजली!

आज ... आपल्यामध्ये नाहीत
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली!
 
आयुष्याच्या या प्रवासात तुमचे योगदान अमूल्य होते...
तुमची कमी सदैव जाणवेल
भावपूर्ण श्रद्धांजली!
 
हसतमुख उमदा चेहरा अकाली काळाने हिरावून नेला...
कर्तव्यपूर्तीसाठी चंदनाप्रमाणे झिजावे असा संदेश देऊन गेला
भावपूर्ण श्रद्धांजली!
 
आठवीता सहवास आपला, पापणी ओलावली...
विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज ही श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

१० मिनिटांत बनवा मऊ आणि लुसलुशीत रवा इडली; पाहा सोपी पद्धत