Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Russia -Ukraine : रशियाने युक्रेनच्या इझमेल बंदरांवर मोठा हल्ला केला, अन्नधान्य संकट होऊ शकते

Webdunia
मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 (16:38 IST)
Russia -Ukraine : रशियाने युक्रेनच्या इझमेल बंदरावर मोठा हल्ला केला आहे. हे बंदर युक्रेनमधील धान्य निर्यात करणाऱ्या सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक आहे. रशियाने या बंदरावर ड्रोन हल्ला केला असून त्यात या बंदराचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी हा हल्ला झाला आहे. 
 
हा परिसर डॅन्यूब नदीवर बांधला गेला आहे. रशियन ड्रोन हल्ल्यात बंदरातील गोदामे, उत्पादन इमारती, कृषी यंत्रसामग्री आणि उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. युक्रेन हा जगातील सर्वात मोठा अन्नधान्य निर्यात करणारा देश आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे अन्नधान्याची निर्यात ठप्प झाली असून, त्याचा परिणाम जगभरात अन्न संकटाच्या रूपात दिसून येत आहे. विशेषतः आफ्रिका, मध्य पूर्व आणि आशियातील अनेक देशांमध्ये अन्न संकट अधिक गंभीर आहे. आता धान्य निर्यातीसाठी तयार असलेल्या बंदरावर हल्ला झाल्याने अन्नधान्य संकट अधिक गडद होऊ शकते.
 
अन्नधान्याच्या निर्यातीसाठी रशियासोबत काळा समुद्र करार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, जेणेकरून युक्रेनमधून अन्नधान्य निर्यात करता येईल. याबाबत तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात सोमवारी एक महत्त्वाची बैठक होणार आहे, मात्र या बैठकीपूर्वीच युक्रेनच्या बंदरावर मोठा हल्ला झाला आहे. ज्यामध्ये अन्नधान्याची निर्यात करणाऱ्या युक्रेनच्या महत्त्वाच्या बंदराचे मोठे नुकसान झाले आहे.

जुलै 2022 मध्ये झालेल्या करारानुसार, युक्रेनच्या तीन बंदरांमधून 36 दशलक्ष टन धान्य आणि इतर वस्तू निर्यात करण्यास तयार आहेत, परंतु सहा आठवड्यांपूर्वी रशियाने या करारातून माघार घेतली. तेव्हापासून डॅन्यूबवरील बंदरांवर अनेकदा हल्ले झाले आहेत. 
 



Edited by - Priya Dixit   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

सर्व पहा

नवीन

पश्चिम बंगाल मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी हिंसाचार उसळला

ऋषिकेश-चंबा महामार्गावर अपघात,ITBP जवानांनी भरलेली बस उलटली

माजी पोलिस आयुक्तांवर दाखल केलेला खटला तक्रारदारची मागे घेण्याची मागणी

इमारतीतून अचानक 500-500 च्या नोटांचा पाऊस पडू लागला, लोकांची गर्दी

Irani Cup: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने 27 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले

पुढील लेख
Show comments