Marathi Biodata Maker

नाग पंचमी : चांदीचे नाग-नागीण बनवून नागपंचमीसाठीचे हे 7 उपाय करून बघा...

Webdunia
रविवार, 19 जुलै 2020 (17:10 IST)
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा आणि उपासना केली जाते.
 
चला जाणून घेऊ, या शुभदिनी कोणती पूजा आणि उपाय केले जाऊ शकतात जेणे करून सर्व संकटे दूर होतील आणि त्याचे फायदे मिळतील.
 
1 नागाच्या पूजेचा आधी भगवान शंकराची पूजा करतात या नंतर आपण घरातच चांदीच्या नाग-नागिणी सह या 8 नागांचे मंत्रासह त्यांची पूजा करावी. 1. अनंत (शेष), 2. वासुकी, 3. तक्षक, 4. कर्कोटक, 5. पद्म, 6. महापद्म, 7. शंख आणि 8. कुलिक.
 
2 नागपूजेसह नागाची आई कद्रू, मनसादेवी, बलरामाची बायको रेवती, बलरामाची आई रोहिणी आणि सापांची आई सुरसाची देखील प्रार्थना करा. 
 
3 नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर शेण, गेरू किंवा मातीच्या सापाची आकृती बनवावी आणि त्यांची पूजा करावी. असे केल्याने आर्थिक लाभ तर होईलच, त्याच बरोबर घरावर येणारे संकटे देखील दूर होतील.
 
4 चांदीचे नाग- नागीण नसेल तर एका मोठ्या दोऱ्यात सात गाठी लावून त्याला सर्पाकार आकृती द्या. नंतर त्यांना एका आसनावर स्थपित करून त्यावर कच्चं दूध, बत्ताशे आणि फुल व्हावे. नंतर गुग्गुळाची धूप द्यावी. या दरम्यान राहू-केतूच्या मंत्रांचा जप करावा. राहूचा मंत्र ''ऊ रा राहवे नम: आणि ''ऊ कै केतवे नम: चे जप समसंख्येत करावे. या नंतर भगवान शंकराचे ध्यान करत एक एक करून दोरीची गाठ उघडावी. नंतर जेव्हा वेळ असेल तर त्या दोरीला वाहत्या पाण्यात सोडून द्यावी. असे केल्याने कालसर्प दोष असल्यास दूर होईल.
 
5 चांदीच्या दोन सापांच्या बरोबर स्वस्तिक बनवा. आता ताटलीत ठेवून या दोन्ही सापांची पूजा करावी आणि दुसऱ्या ताटात स्वस्तिक ठेवून त्याची पूजा करावी. सापांना कच्चं दूध घालावं. आणि स्वस्तिक वर बेलाची पान अर्पित करावी. मग दोन्ही ताटल्या समोर ठेवून 'ऊ नागेंद्रहाराय नम:' मंत्राचे जप करावे. त्यानंतर नागांना घेऊन जाऊन शिवलिंगा वर अर्पण करा आणि स्वस्तिकाला गळ्यात घाला. असे केल्यास सापांची भीती आणि त्याच्याशी निगडित येणारे स्वप्न नाहीसे होतात.
 
6 नाग पंचमीच्या दिवशी नागांना दूध पाजणे अत्यंत शुभ मानले जाते. जर आपण कोरोना काळात नागांना दूध पाजू शकत नसाल तर चांदीचे दोन साप बनवून त्यावर कच्चं दूध घालून त्याची विधी-विधानाने पूजा करावी. असे केल्याने आपल्या जीवनातील दुःख दूर होतील. नागाच्या ऐवजी गायीला देखील दूध पाजता येऊ शकतं.
 
7 नागपंचमीच्या दिवशी चांदीने बनवलेले नाग-नागिणीचं जोडपं एखाद्या ब्राह्मणाला किंवा देऊळात देणे शुभ मानले जाते. त्यासाठी हे आवश्यक नाही की चांदीचे मोठेच नाग-नागिणीचं जोडपं असावं आपण पातळ तारेचे देखील बनवू शकता. या मुळे आपली आर्थिक चणचण दूर होऊन आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता वाढेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्री अक्कलकोट स्वामी महाराज स्तोत्र

Shri Swami Samarth Temple लाखो भाविकांचे श्रद्धास्थान वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट

अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती

स्वामी समर्थ सप्तशती संपूर्ण अध्याय १ ते १०

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

पुढील लेख
Show comments