Dharma Sangrah

Offer Shivmuth to shiv शिवामूठ (शिवमुष्टीव्रत) कसे करावे

Webdunia
offer Shivmuth to shiv शिवामूठ व्रत हे विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावणी सोमवारी केलं जातं. श्रावणात येणार्‍या सोमवारी 4 प्रकाराचे धान्य शिवाला अर्पण केले जाते. नवविवाहित स्त्रियांनी शिवमुष्टिव्रत करावयाचे असते. यात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून महादेवाला बेलाची पाने, तांदूळ, सुपारी, गन्ध, फूल वाहून पूजा करावी. आणि या क्रमाने धान्याच्या एक-एक मूठ देवावर वाहव्या. धान्यमूठ उभी धरून वाहावी. या मुठी वाहताना पुढील मंत्र म्हणावा-
नमः शिवाय शांताय पंचवक्‍त्राय शूलिने ।
शृंगिभृंगिमहाकालगणयुक्ताय शंभवे।।
 
किंवा "शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या ईच्छा पूर्ण कर रे देवा" असे तीन वेळा म्हणावे.
 
प्रथम सोमवारी तांदूळ
दुसर्‍या सोमवारी पांढरे तीळ
तिसर्‍या सोमवारी मूग
चौथ्या सोमवारी जवस
आणि पाचवा सोमवार आल्यास सातू अर्पित करावे.
 
दिवसभर उपास करावा व संध्याकाळी देवाला बेल वाहून उपास सोडावा. पाच वर्षांनंतर या व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करावी. नंतर ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन व्रताची समाप्ती करावी.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Holika Dahan 2026: कर्जामुळे त्रस्त आहात? होळीच्या चमत्कारिक उपाय, लगेच मिळेल समाधान

सोमवारी महामृत्युंजय जप करणे आरोग्यासाठी फायदेशीर

Holika Dahan 2026: होलिका दहन आणि होळीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व, जाणून घ्या 4 उपयुक्त गोष्टी

आरती सोमवारची

Holi 2026 Wishes in Marathi होळीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

पुढील लेख
Show comments