Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवलिंगापासून औषध आणि सोनं बनविण्याचे गूढ काय खरं आहेत ...?

शिवलिंगापासून औषध आणि सोनं बनविण्याचे गूढ काय खरं आहेत ...?
, बुधवार, 22 जुलै 2020 (15:34 IST)
अनिरुद्ध जोशी

शिवलिंगाबद्दल अनेक प्रकारचे गूढ सांगितले जाते. कोणी म्हणते की हे विश्वाचे प्रतीक आहेत तर कोणी ह्याला ज्योतिर्लिंग मानतात, म्हणजे ते आत्मा आणि परमात्माच्या निराकार असल्याचे प्रतीक आहे. काही जण ह्याला शिवाचे मूळ आणि शाश्वत रूप मानतात तर कोणी ह्याला निराकार ब्रह्म मानतात.
 
चला तर मग जाणून घेऊया एक नवं गूढ जे फार कमी लोकांनाच माहीत आहे.
 
1  शिवलिंगाची संरचना: शिवलिंगाचे 3 भाग आहेत. पहिला भाग जो तळाचा भाग असतो जो सर्वत्र भूमिगत राहतो. मध्यभागी आठ बाजूने एकसारखी पितळ्याची बैठक तयार करतात. शेवटी ह्याचा वरचा(शीर्ष) भाग, जो अंडाकृती असतो ज्याची पूजा केली जाते. या शिवलिंगाची उंची संपूर्ण मंडळाच्या किंवा घेराच्या एक तृतियांश असते.
 
हे 3 भाग ब्रह्म (खाली), विष्णू (मध्य), आणि शिव (शीर्ष) यांचे प्रतीक आहेत.
 
शीर्षेवर पाणी घालतात, जे खाली बैठकीतून वाहत असताना बनविलेल्या एका वाटेतून निघून जातं. प्राचीन काळात ऋषी आणि मुनींनी विश्वाचे वैज्ञानिक गूढ समजून या सत्याला प्रगट करण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपात स्पष्टीकरण दिले गेले आहेत.
 
2 औषध आणि सोन्याचं गूढ : शिवलिंगात एक दगडाची आकृती असते. जलधारी पितळ्याची असते आणि नाग किंवा साप तांब्याचे असते. शिवलिंगावर बेलाची पानं आणि धोत्र्याचे किंवा आकड्याचे फुल वाहतात. शिवलिंगावर पाणी पडतच राहतं. असे म्हणतात की ऋषी-मुनींनी प्रतिकात्मक किंवा प्राचीन विद्येला वाचविण्यासाठी शिवलिंगाची रचना अश्या प्रकारे केली आहे की कोणी त्याचा रहस्याला समजून त्याचा फायदा घेऊ शकतो, जसे की शिवलिंग म्हणजे पारा, जलधारी म्हणजे पितळ्याची धातू, नाग म्हणजे तांब्याची धातू इत्यादीला बेलाची पानं, धोत्रा आणि आकड्याने मिसळून काही औषध, चांदी किंवा सोनं बनवू शकतो. असे मानले जाते की हे गूढ अनेक प्राचीन पुस्तकात नोंदले गेले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शनी प्रदोष व्रत : शनी प्रदोषाच्या उपवासाचे महत्त्व जाणून घेऊ या आणि हे 10 सोपे उपाय करून बघा ....